लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मोदी सरकारवर देश विकल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मित्र आदानी आणि अंबानी यांना देश विकला, असे राहुल गांधी म्हणाले. पण अमेरिकन गुप्तहेर संस्था CIA चा अहवाल आणि रशियन KGB संस्थेचा पहिला प्रमुख मित्रोखिन यांच्या डायरीतून मात्र वेगळेच “सत्य” बाहेर आले. एच. के. एल. भगत सुभद्रा जोशी यांच्यासह काँग्रेसचे 150 नेते सोवियत रशियाच्या pay roll वर असल्याचे धक्कादायक खुलासे समोर आले.
1970 आणि 80 च्या दशकात भारत सोवियत रशिया यांच्या मैत्रीचा फार बोलबाला असताना भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसच्या 150 नेत्यांनी सोवियत रशियाकडून पैसे घेतले. कम्युनिस्ट अजेंडा चालवणारी तब्बल 16000 आर्टिकल्स सोवियत रशियाकडून प्रसृत केली गेली. ती भारतात छापली गेली. या सगळ्याला Iron lady इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने नुसता पाठिंबा दिला नाही, तर सोवियत रशियाचे “सक्रिय सहकार्य” घेतले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खाते सांभाळणारे मंत्री एच के एल भगत, माजी मंत्री सुभद्रा जोशी यांच्यासह काँग्रेसच्या तब्बल 150 नेत्यांनी सोवियत रशियाकडून निवडणूक निधी घेतला होता. तो निवडणुकीत वापरून ते निवडून आले होते.
काँग्रेसच्या नेत्या सुभद्रा जोशी यांनी 1977 ते 1980 या कालावधीत जर्मनीच्या सरकारकडून 5 लाख रुपये घेतले होते. ते त्यांनी निवडणुकीत वापरले. त्यानंतर त्या इंडो जर्मन फोरमच्या अध्यक्ष बनल्या. या त्याच सुभद्रा जोशी होत्या, ज्यांनी इंदिरा गांधींना आणीबाणीच्या सुरुवातीच्या काळात जनतेचे हाल करू नका, असे “समजून” सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी सुभद्रा जोशींचा सल्ला धुडकावला होता.
10 मे 1979 रोजी राज्यसभेत या विषयावर दीर्घ चर्चा झाली होती. त्याचवेळी अमेरिकन अँबेसिडर Moynihan यांचे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात त्यांनी थेट इंदिरा गांधींना पैसे दिल्याचा उल्लेख केला. अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर यांच्यातल्या फोन कॉलचा त्यात उल्लेख आला. त्यामध्ये भारतातल्या काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या सरकारला कसे “मॅनेज” करायचे याचा उल्लेख होता.
निशिकांत दुबे यांचे आरोप
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडिया अकाउंट वर सविस्तर पोस्ट लिहून या संदर्भात खुलासा केला. 2004 मध्ये मनमोहन सिंग सरकार आल्यानंतर त्या वेळचे रिसर्च अँड ॲनालिसिसचे जॉईन डायरेक्टर रवींद्र सिंग यांना देशाबाहेर पाठवण्यात आले नाही. त्यानंतर त्यांना परत बोलवण्यात देखील आले नाही. तथाकथित आयर्न लेडी इंदिरा गांधींचे सरकार एकतर सीआयए चालवत होती किंवा केजीबी चालवत होते, असा आरोप निशिकांत दुबे यांनी केला.
यशवंतराव चव्हाण यांचा खुलासा
निशिकांत दुबे यांच्या आरोपांना राजकीय लेबल लावले आणि त्यांना बाजूला ठेवले तरी इंदिरा गांधींच्या काळात सोवियत रशिया किंवा अमेरिका यांच्याकडून पैसे घेण्याचा मुद्दा चर्चेला आला होता, हे सत्य नाकारण्यात मतलब नाही. त्यावेळच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या दिल्ली वार्तापत्र मध्ये त्याचा उल्लेख आला होता. यासंदर्भात इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातले संरक्षण मंत्री बाबू जगजीवन राम आणि परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावर देखील ते CIA चे एजंट असल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी दोघांनी ते आरोप फेटाळले होते. परंतु, निवडणुकांसाठी इंदिरा गांधींनी परदेशातून निधी आणल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्या संदर्भात यशवंतरावांनी वेगळा खुलासा केला होता. इंदिरा गांधींपुढे देशातले उद्योगपतीच ज्यावेळी थैल्या खोलून उभे राहिले, त्यावेळी इंदिरा गांधींना परदेशातून पैसा आणायची गरजच काय?, असा प्रति सवाल यशवंतरावांनीच पत्रकारांना केला होता. ज्येष्ठ पत्रकार गंगाधर इंदुरकर यांनी यशवंतरावांच्या या उत्तराचा आपल्या दिल्ली दिनांक या पुस्तकात विशेष उल्लेख केला होता.
HKL Bhagat, more than 150 Congress MPs were funded by Soviet Russia.
महत्वाच्या बातम्या
- Manisha Kayande : उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्या विचारसरणी पूर्णपणे वेगळ्या – मनीषा कायंदे
- India-France : भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव ‘शक्ती-२०२५’ मुळे भारतीय सैन्याची क्षमता वाढणार
- Kolkata law college : कोलकाता येथील लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात चौथी अटक
- Oman : ओमानमध्ये राहणाऱ्या सात लाख भारतीयांचं टेन्शन वाढणार?