• Download App
    इतिहासाचे काँग्रेस कृत पुनर्लेखन; काँग्रेसच्या जाहिरातीत नरसिंह राव "इन"; मौलाना आझाद "आउट"!!History rewriting of Congress, narasimha rao "in"; maulana azad "out" in Congress advertisement

    इतिहासाचे काँग्रेस कृत पुनर्लेखन; काँग्रेसच्या जाहिरातीत नरसिंह राव “इन”; मौलाना आझाद “आउट”!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये झालेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात ज्या बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट काँग्रेसच्या नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे, ती म्हणजे गांधी परिवाराच्या वर्चस्वाखाली काँग्रेसच्या जाहिरातीत एकीकडे अत्यंत “उदार मनाने” नरसिंहराव यांना स्थान दिले, तर दुसरीकडे त्याच जाहिरातीतून मौलाना आझाद यांच्यासारख्या काँग्रेस अध्यक्षाला वगळून टाकले!! आता मौलाना आझादांना जाहिरातीतून वगळून टाकण्याचाच मुद्दा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरला आहे!! काँग्रेसवर हिंदुत्ववादी भाजपला फॉलो करत असल्याचा आरोप लागला आहे. History rewriting of Congress, narasimha rao “in”; maulana azad “out” in Congress advertisement

    रायपूर मध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन झाले. या महाधिवेशनात राजकीय, सामाजिक, आर्थिक ठराव काँग्रेसच्या नेत्यांनी एकमताने संमत केले. पण त्या ठरावांपेक्षा दोनच मुद्द्यांची जास्त चर्चा झाली, ती म्हणजे सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिले आणि राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्यावर अस्थानी टीका या बातम्यांची. या दोन बातम्यांनीच काँग्रेसचा टीआरपी मीडियामध्ये टिकून राहिला. बाकीच्या बातम्यांना तुलनेत दुय्यम स्थान मिळाले. मात्र सोनिया गांधींची निवृत्तीचे संकेत आणि राहुल गांधींची सावरकरांवरची टीका या पाठोपाठ तिसऱ्या बातमीने काँग्रेससाठी टीआरपी मीडियामध्ये टिकवून ठेवला आहे, ती म्हणजे काँग्रेसच्या जाहिरातीतून मौलाना आझाद यांना वगळले ही ती बातमी होय!!

    वास्तविक पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासारख्या माजी पंतप्रधानांना आणि काँग्रेस अध्यक्षांना गांधी परिवाराच्या वर्चस्वाखालील काँग्रेसमध्ये कधीच उचित सन्मान दिला नाही, असा आरोप नेहमीच होत असतो. हा आरोप टाळण्यासाठी रायपूर अधिवेशनाच्या जाहिरातीत काँग्रेसने नरसिंह राव यांच्या फोटोचा आवर्जून समावेश केला. पण नेमका मौलाना आझाद यांचा फोटो वगळून टाकला.

    हेच ते मौलाना आझाद होते, जे स्वातंत्र्यलढ्यात 10 वर्षांसाठी तुरुंगवासात गेले होते. इतकेच नाही तर 1940 ते 1946 या अत्यंत निर्णायक महत्त्वाच्या 6 वर्षांमध्ये ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते. ब्रिटिश आणि मुस्लिम लीग यांच्याशी ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनच वाटाघाटी करत होते. याच मौलाना आझाद यांनी मुस्लिम लोकसंख्या विभाजित होऊ नये म्हणून अखंड भारताचा प्रस्ताव काँग्रेस पुढे सातत्याने मांडला होता. फाळणीला विरोध केला होता. पण त्याच मौलाना आझाद यांना काँग्रेसच्या जाहिरातीतून रायपूरच्या अधिवेशनात वगळल्याने काँग्रेस नेत्यांवर ठपका ठेवायला मुस्लिम नेत्यांना संधी मिळाली. त्यामुळे जयराम रमेश या मुख्य प्रवक्त्यांना माफी मागावी लागली आणि मौलाना आझाद यांचा फोटो जाहिरातीतून कोणी वगळला त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित व्यक्तीला शिक्षा करण्याचे आश्वासन द्यावे लागले.

    पण यानिमित्ताने काँग्रेस इतिहासाचे पुनर्लेखन करू इच्छित आहे हे मात्र स्पष्ट झाले. याच काँग्रेसचे नेते भाजपवर देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास पुनर्लेखनाचे आरोप करत असतात. पण त्यांनीच भाजपच्या हिंदुत्ववादी पावलावर पाऊल टाकून आपल्याच माजी अध्यक्षांना काँग्रेसच्या जाहिरातीतून वगळण्याची टीका अलीगड मुस्लिम विद्यापीठातील विद्वानांनी केली आहे. आता याचे पुढचे राजकीय परिणाम काय होतात?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    History rewriting of Congress, narasimha rao “in”; maulana azad “out” in Congress advertisement

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली