वृत्तसंस्था
कोहिमा : नागालँड मधील 2023 च्या विधानसभा निवडणूकांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. या ईशान्येकडील राज्याचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. आता जाहीर झालेल्या निकालानुसार दोन महिलांनी यावेळी बाजी मारली आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. तब्बल 60 वर्षांनी राज्याला महिला आमदार मिळाल्या आहेत. Hekani jakhalu आणि Salhoutuonuo kruse या भाजपचा मित्रपक्ष एनडीपीपी पक्षाच्या दोन महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. नागालँड सारख्या पारंपारिक ख्रिश्चन आणि आदिवासी बहूल राज्यात स्वावलंबी स्त्रियांनी निवडून येणे ही खूप मोठी बाब आहे.History made in Nagaland: For the first time two highly educated women candidates won assembly elections!!
स्थानिक हॉटेल मालक Salhoutuonuo kruse यांनी अपेक अपक्ष केनीझाखो नखरो यांच्या विरोधात निवडणूक लढवली. आसामचे मुख्यमंत्री हिंमता विश्वशर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रियो यांनी क्रूसे साठी प्रचार केला होता.
जाखालू केन्स या अमेरिकेत शिकलेल्या वकील आहेत, तर सामाजिक उद्योजक आणि युथनेटच्या संस्थापक देखील आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींकडून नारी शक्ती पुरस्कारही मिळाला आहे. दिमापूरच्या जागे बद्दल बोलताना जखालू यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात युवा विकास, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्यांक हक्क आणि मॉडेल मतदारसंघासाठी आपला दृष्टिकोन मांडला आहे.
नागालँडला 1963 मध्ये राज्याचा दर्जा मिळाल्यापासून, 60 सदस्यांच्या विधानसभेत महिला आमदाराची निवड होणे ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बाब आहे. या आधी महिलांनी निवडणूक लढवली नव्हती, असे नाही. पण त्यांना कधीच संधी मिळाली नाही. यंदाच जखालू, क्रूसे, काँग्रेसच्या रोझी थॉमसन आणि भाजपच्या काहुली सेमा या चार महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली.
हीच गोष्ट नागालँडसाठी बदल घडणारी ठरवू शकते. एखाद्या पारंपारिक विचार शैली असलेल्या राज्यात अमेरिकेत शिकलेली महिला वकील, त्याच बरोबर स्थानिक हॉटेल चालविणारी महिला अशा दोन भिन्न क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांमुळे नागालँडमध्ये महिलांच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे मानण्यास वाव आहे.
History made in Nagaland: For the first time two highly educated women candidates won assembly elections!!
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस आमदार सफिया जुबेर म्हणाल्या- आम्ही राम-कृष्णाचे वंशज : अमीन खान म्हणाले – भारत धर्मनिरपेक्ष मानले जात नाही, हिंदू राष्ट्रातही कोणी मारणार नाही
- केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींचे भाषण: म्हणाले- जिथे लोकशाही नाही, असे जग निर्माण होताना पाहू शकत नाही
- आमदार अपात्र ठरले असते तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण