वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO इसरोने शुक्रवारी आणखी एक इतिहास घडविला आहे. भारताने 18 नोव्हेंबर, शुक्रवारी पहिले खासगी राॅकेट प्रक्षेपित केले आहे. इसरोचे पहिले प्रायव्हेट राॅकेट श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले आहे. History made by Rahulji’s ISRO; First private rocket Vikram-S launched
भारताचे पहिले खासगी राॅंकेट ‘विक्रम- एस’ सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेपावले. भारतासाठी हे फार मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे अवकाशात भारतासाठी नवा अध्याय सुरु झाला आहे. हे राॅकेट 81 किलोमीटर उंचीवर पोहोचणार आहे. स्काय रुट एअरोस्पेस या कंपनीने या राॅकेट लाॅंचची तयार केली आहे.
भारतासाठी महत्त्वाचे पाऊल
श्रीहरीकोटामधून भारताने अंतराळात पहिल्या खासगी राॅकेटचे प्रक्षेपण केले आहे. विक्रम- सबऑरबिटल राॅकेट असे या राॅकेटचे नाव आहे. स्काईरुट एयरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीने या राॅकेटची निर्मिती केली आहे. 550 किमी वजनाचे हे सिंगल स्टेज स्पिन स्टेबलाइज्ड साॅलिड प्रोपेलेंट राॅकेट आहे. शुक्रवारी उड्डाण केल्यानंतर हे राॅकेट सुमारे 100 किलोमीटरपर्यंत झेप घेईल आणि त्यानंतर समुद्रात कोसळेल. केंद्रीय अंतराळ मंत्री डाॅ. जितेंद्र सिंह या प्रक्षेपणावेळी उपस्थित राहणार आहेत.
History made by Rahulji’s ISRO; First private rocket Vikram-S launched
महत्वाच्या बातम्या