हंसी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
विशेष प्रतिनिधी
हिस्सार : Sampat Nehra हिसार स्पेशल टास्क फोर्सने (STF) मंगळवारी लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी संपत नेहरा याला अटक केली. यानंतर त्याला हांसी न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.Sampat Nehra
स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) लॉरेन्सचा सहकारी संपत नेहराला भटिंडा तुरुंगातून प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले होते. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने पोलिसांना संपत नेहराला 27 नोव्हेंबर (बुधवार) दुपारी 4 वाजेपूर्वी पुन्हा न्यायालयात हजर करण्यास सांगितले.
रिपोर्टनुसार, संपत नेहराने हंसीच्या सिसाई गावात राहणाऱ्या सोनूला 31 जुलै आणि पुन्हा 1 ऑगस्ट 2023 रोजी फोन करून खंडणीची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी संपतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संपत नेहरावर गुन्हा दाखल असून तो सध्या भटिंडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनूने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले होते की, 31 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता संपत नेहरा नावाचा कॉल आला होता. मला फोन आल्यावर फोन करणाऱ्या नेहराने पैशांची मागणी केली. तसेच पैसे भरण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आल्याचे सांगितले. पैसे न दिल्यास मारून टाकू, असेही सांगण्यात आले. सोनूने त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलल्याचे सांगितले होते. सोनूने पोलिसांना व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉटही दिले होते.
Hisar STF arrests Lawrence Bishnois associate Sampat Nehra
महत्वाच्या बातम्या
- Bangladesh बांगलादेशातील हिंदू पुजाऱ्याच्या अटकेवर भारताने नोंदवला तीव्र आक्षेप
- Savarkar सावरकरांच्या संविधानिक विचारात हिंसेचे समर्थन नाही, उलट सर्व भारतीयांना समान नागरिकत्व आणि लोकशाहीचाच पुरस्कार!!
- Central government : केंद्र सरकारने पॅन 2.0 अन् वन नेशन वन सबस्क्रिप्शन मंजूर केले
- Shaktikanta Das : RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल!