प्रतिनिधी
भोपाळ : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर गोची झालेल्या काँग्रेसचा आता हिंदुत्वाचा अजेंडा बाहेर आला आहे. त्यातून मध्य प्रदेशातल्या काँग्रेस मुख्यालयावर भगवा झेंडा फडकला आहे!!Hindutva agenda of the Congress, which got stuck on the Savarkar issue; Saffron flag hoisted at headquarters in Madhya Pradesh!!
काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफी नाम्यावरून अपमान केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा काँग्रेसला दम भरला. शरद पवारांनी मध्यस्थी केली. पण काँग्रेसची यातून पुरती गोची झाली. आता त्या गोचीतून काँग्रेसला बाहेरही न पडता येण्याची स्थिती झाली आहे. कारण महाराष्ट्रात शिवसेना – भाजपची तर सावरकर गौरव यात्रा दणक्यात सुरू झाली आहेच, पण सावरकर भाजपच्या हिंदुत्वाचे लोण मध्यप्रदेशात देखील पोहोचले आहे. सावरकर आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या पाठीमागे काँग्रेसची फरफट झाली आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मुख्यालयावर पहिल्यांदा भगवे झेंडे फडकले आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसच्या पुजारी सेलच्या एक मेळावा काँग्रेसच्या मुख्यालयात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आयोजित केला आहे. कमलनाथ हे छिंदवाडयाच्या हनुमानाचे मोठे भक्त आहेत आणि भाजपने छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ आणि आसपासच्या परिसरावर राजकीय टार्गेट केल्यानंतर कमलनाथांचे हिंदुत्व जागे झाले आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस संघटने अंतर्गत असलेल्या पुजारी सेलचा मेळावा काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित केला आहे. मध्य प्रदेशातील मंदिर व्यवस्थापन सरकारच्या नियंत्रणाखालून काढून घेऊन ते स्थानिक पुजाऱ्यांच्या नियंत्रणाखाली देण्याचा कमलनाथांचा विचार आहे. यासंदर्भात मेळाव्यात मागणी, चर्चा आणि ठरावही होणार आहे.
पण या निमित्ताने मध्य प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयावर सगळीकडे भगवे झेंडे फडकण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. काँग्रेसच्या मुख्यालय वर नुसते भगवे झेंडे फडकलेत असे नाही, तर मोठमोठ्या भगव्या पताका तीन मजल्यांवरून खालीपर्यंत सोडल्या आहेत. एकूणच काँग्रेस कार्यालयाचे पुरते भगवेकरण झाले आहे. हीच नेमकी सावरकर आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या पाठीमागे काँग्रेसची राजकीय फरफट आहे.
Hindutva agenda of the Congress, which got stuck on the Savarkar issue; Saffron flag hoisted at headquarters in Madhya Pradesh!!
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा