• Download App
    ''हिंदुंनी हलाल मांस खाणे बंद करावे आणि....'' ; केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांनी केले विशेष आवाहन!|Hindus should stop eating Halal meat Union Minister Giriraj Singh made a special appeal

    ”हिंदुंनी हलाल मांस खाणे बंद करावे आणि….” ; केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांनी केले विशेष आवाहन!

    आता हिंदूंनीही त्यांच्या धार्मिक परंपरांप्रती अशीच बांधिलकी दाखवायला हवी, असंही म्हणाले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते गिरिराज सिंह यांनी रविवारी (17 डिसेंबर) मोठे वक्तव्य केले. हिंदूंनी हलाल मांस खाणे बंद करावे, त्यांनी फक्त झटक्याचे मांस खावे. कारण, झटक्याच्या मांसामध्ये जनावराची एकाच फटक्यात कत्तल केली जाते. असं ते म्हणाले आहेत.Hindus should stop eating Halal meat Union Minister Giriraj Singh made a special appeal

    एवढच नाहीतर गिरिराज सिंह यांनी आपल्या बेगुसराय मतदारसंघातील समर्थकांना आतापासून हलाल मांस खाऊन धर्म भ्रष्ट करणार नाही, अशी शपथ घेण्यास सांगितले आहे.



    सगळ्यात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे मुस्लिमांबद्दलच्या तिखट विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गिरीराज यांनी त्यांचे कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की मी त्या सर्व मुस्लिमांचे कौतुक करतो ज्यांनी ठरवले आहे की ते फक्त हलाल मांस खातील. आता हिंदूंनीही त्यांच्या धार्मिक परंपरांप्रती अशीच बांधिलकी दाखवायला हवी. मुस्लीम समाजात झटका मांस खाण्यास मनाई आहे. या कारणास्तव ते फक्त हलाल मांस खातात.

    केंद्रीय मंत्री म्हणाले की, प्राण्यांची कत्तल करण्याची हिंदू पद्धत झटका आहे. जेंव्हा हिंदू प्राण्यांचा बळी देतात तेंव्हा ते त्यांना एकाच फटक्यात मारतात. त्यामुळे त्यांनी हलाल मांस खाऊन भ्रष्ट होऊ नये. त्यांनी नेहमी झटक्याचे मांसच खावे. गिरीराज सिंह यांनी असे कत्तलखाने स्थापन करण्याची गरज व्यक्त केली जिथे झटक्याद्वारे जनावरांची कत्तल केली जाते आणि फक्त झटक्याचे मांस विकणारी दुकाने असावीत.

    Hindus should stop eating Halal meat Union Minister Giriraj Singh made a special appeal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र