कॉल करणाऱ्याने इस्लामिक गटाचा सदस्य असल्याचा दावा केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशात ( Bangladesh ) सध्या परिस्थिती सामान्य नाही. आताही अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. प्रचंड हिंसाचारानंतर आता बांगलादेशात हिंदूंना धमकावले जात आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागितली जात आहे. एका बांगलादेशी हिंदू विद्यार्थ्याने हा खुलासा केला आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या घरांची ओळख पटवली जात आहे आणि त्यानंतर त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. अनेकांना धमकीचे फोन आले आहेत.
‘टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बांगलादेशी हिंदू विद्यार्थ्याने सांगितले की त्याचे पालक वृद्ध आहेत आणि ते चितगावमध्ये राहतात. त्याला धमकीचा फोन आला. आरोपीने लाखो रुपयांची मागणी केली. रक्कम दिली नाही तर बांगलादेश सोडून जाण्याची धमकी आरोपींनी दिली. या बांगलादेशी हिंदू विद्यार्थ्याने महाराष्ट्रातील एका महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून तो सध्या ढाका येथे कार्यरत आहे.
विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, कॉल करणाऱ्याने इस्लामिक गटाचा सदस्य असल्याचा दावा केला आहे. पाच लाखांची खंडणी मागितली. जर तुम्ही रक्कम देऊ शकत नसाल तर बांगलादेश सोडून जा अन्यथा मृत्यूला सामोरे जा, असे आरोपीने सांगितले. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, इतर लोकांनाही असेच कॉल आले आहेत. बांगलादेश हा अल्पसंख्याकांचा नाही असे हिंदूंना सांगितले जात आहे.
शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जगभरातील अनेक देशांमध्ये निषेध सुरू झाला आहे.
Threatening calls to Hindus in Bangladesh
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!