• Download App
    हिंदू आपल्या चुकांमुळे शेकडो वर्षे गुलाम, बंगालमध्ये अजूनही भरतोय जिझिया कर, संबित पात्रा यांचे प्रतिपादन|Hindus enslaved for hundreds of years due to their mistakes, still paying jizya tax in Bengal

    हिंदू आपल्या चुकांमुळे शेकडो वर्षे गुलाम, बंगालमध्ये अजूनही भरतोय जिझिया कर, संबित पात्रा यांचे प्रतिपादन

    हिंदू आपल्या चुकांमुळे शेकडो वर्षे गुलाम होता. त्याचबरोबर बंगालमध्ये अजूनही जिझिया कर भरला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.Hindus enslaved for hundreds of years due to their mistakes, still paying jizya tax in Bengal


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हिंदू आपल्या चुकांमुळे शेकडो वर्षे गुलाम होता. त्याचबरोबर बंगालमध्ये अजूनही जिझिया कर भरला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
    संबित पात्रा यांनी न्यूज १८ इंडियाला मुलाखत दिली. ते म्हणाले, सरकारे येतील आणि जातील, इतकी वर्षे हिंदू गुलाम का आहेत?

    कारण तो स्वत: गुलाम होतो. तो स्वत:ला  बेड्या विकत घेतो आणि स्वत:  पायात घालतो. धिक्कार आहे अशा लोकांवर, बंगालमध्ये दररोज एक महिला मरत आहे. आमचे लोकं मुस्लिम खेड्यात जाऊ शकत नाहीत. अद्यापही जिझिया कर भरावा लागत आहे. बाबर, औरंगजेब गेल्यानंतरही आम्ही जिझिया कर भरत आहोत.



    पण या सर्व मुद्द्यांवर कधी वादविवाद होत नाहीत. का होईल? कसा होईल? कारण आमचे पत्रकार तिथे जात नाहीत. आमचे लोकं घाबरले आहेत की आम्ही ट्विट केले तर आमच्यावर केस येईल.अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्यावर टीका करताना पात्रा म्हणाले, तिला खरोखरच अभिनय येतो का?

    पण आपण लोकांनीच अशा लोकांना डोक्यावर बसविले आहे. त्यांच्यासाठी इतके मोठे माध्यम उपलब्ध करून दिले आहे.कमलेश तिवारी यांचा संदर्भ देत संबित पात्रा म्हणाले, त्यांचा गळा कापला गेला पण कोणाही नेत्याची प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही.

    ही चूक सरकारची नाही तर आपली आहे. हिंदूंमध्येही ३६ कोटी लोक धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवितात ही आमचीच चूक आहे. आम्ही न बोलावताच टोपी घालून इफ्तार पार्टीला जातो. त्यांचा कोणी दिवाळीच्या पार्टीसाठी येतो का?

    Hindus enslaved for hundreds of years due to their mistakes, still paying jizya tax in Bengal

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार