वृत्तसंस्था
वाराणसी : ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात 1993 पर्यंत होत असलेली पूजा त्या वेळच्या मुलायम सिंह यादव सरकारने बंद केली होती. त्यावेळच्या सरकारची कारवाई बेकायदा होती, असा निर्वाळा देत वाराणसी जिल्हा न्यायालयाने व्यास तळघरात पुन्हा पूजा सुरू करण्याचे आदेश वाराणसी प्रशासनाला दिले आहेत. ही पूजा आठवडाभरात सुरू करावी, असे कोर्टाने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. Hindus allowed to pray at sealed basement of Gyanvapi complex
1993 पर्यंत ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजाअर्चा होत होती परंतु 1993 मध्ये मुलायम सिंह यादव सरकारने तेथे बेकायदेशीर कारवाई करून व्यास परिवाराकडून ते तळघर काढून घेऊन ते सीलबंद केले होते. तिथल्या पुजाऱ्यांना तिथून दूर केले होते. त्यानंतर ही केस 30 वर्षे चालली आणि अखेरीस वाराणसी जिल्हा न्यायालयाने व्यास तळघरातली पूजा पुन्हा सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. येत्या 7 दिवसांमध्ये व्यास तळघरातील पूजेची सर्व व्यवस्था प्रशासनाने करावी, असे कोर्टाने आदेशात नमूद केल्याची माहिती हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दिली.
न्यायाधीश के. एम. पांडे यांनी ज्या पद्धतीने राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याचा निर्णय दिला होता, तशाच पद्धतीचा व्यास तळघरातल्या पूजेच्या संदर्भातला आजचा कोर्टाचा निर्णय आहे. यापुढे ज्ञानवापीची केस अत्यंत वेगाने पुढे जाईल आणि ज्ञानवापी पुन्हा हिंदूंसाठी खुली होईल, असा विश्वास विष्णू शंकर जैन यांनी व्यक्त केला.
व्यास तळघर – शृंगार गौरी स्वतंत्र केस
वाराणसी न्यायालयाने दिलेल्या आजच्या निकालाशी शृंगार गौरीचा केसचा काहीही संबंध नाही. ती स्वतंत्र केस आहे. ज्ञानवापीच्या भिंतीलगत शृंगारगौरी मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी 5 महिलांनी स्वतंत्र केस दाखल केली आहे. तिची स्वतंत्र सुनावणी नियमित सुरू आहे. त्यावर कोर्टाचा निर्णय येणे अपेक्षित आहे.
Hindus allowed to pray at sealed basement of Gyanvapi complex
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल म्हणाले- भाजप ट्रम्पप्रमाणे सत्तेला चिकटून राहणार; लोकसभेत हरल्यानंतरही जागा सोडणार नाही
- मद्रास हायकोर्टाचा आदेश- मंदिर हे पिकनिक स्पॉट नाही; बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी, मंदिराच्या गेटवर नो एन्ट्री बोर्ड लावण्याचे निर्देश
- INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली; केरळात डाव्यांनी फोडली; उत्तर प्रदेशात अखिलेशने मोडली!!
- जियोची केंद्र सरकारला शिफारस, युझर्स 5जीवर शिफ्ट करण्यासाठी धोरणाची गरज, 2जी-3जी बंद करा