‘’भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, मात्र तरीही हा देश धर्मनिरपेक्षतेचे पालन करतो.’’ असंही म्हणाल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगातील ६६ देशांमध्ये हिंदू धर्माला मान्यता नाही. परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता अंतर्भूत आहे. हा त्या समस्त देशांसाठी एक धडा आहे, जिथे हिंदूंना धर्म म्हणून मान्यता नाही दिली जात. एक हिंदू असल्याने मला हे पटत नाही. याशिवाय त्यांनी सांगितले की, भारतात हिंदू बहुसंख्य आहे, मात्र तरीही हा देश धर्मनिरपेक्षतेचे पालन करतो. आपली राज्यघटना निर्मित्यांनी देशाला धर्मनिरपेक्ष बनवले. Hinduism Over 66 countries do not recognise Hinduism as a religion Union Minister Meenakshi Lekhi
हिंदू धर्म मानणाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर ते जगातील प्रत्येक देशात आढळतात. भारतात हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांची संख्या जवळपास ८० टक्के आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक हिंदू भारतात राहतात. पूर्वी भारताचा शेजारी देश नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. मात्र राजघराण्यातील हत्याकांडानंतर तिथे लोकशाही बहाल करण्यात आली. तेव्हा नेपाळची घटना बदलून हिंदू राष्ट्र हटवण्यात आले, भारतानंतर हिंदू धर्माचे बहुतांश अनुयायी नेपाळमध्ये राहतात.
जर आपण हिंदूकडे एक धर्म म्हणून पाहिले तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जेएस वर्मा यांनी आपल्या ऐतिहासिक निकालात म्हटले होते की, हिंदू धर्म ही एक जीवनपद्धती आहे.
गेल्या काही काळापासून भारतात हिंदूंचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर मांडले जात आहेत. हिंदू दहशतवाद आणि कट्टरतावादाची चर्चाही विरोधकांकडून केली जात आहे. आता मीनाक्षी लेखी यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या प्रकरणावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण सर्वच देशात हिंदू धर्माला मान्यता न दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Hinduism Over 66 countries do not recognise Hinduism as a religion Union Minister Meenakshi Lekhi
महत्वाच्या बातम्या
- Covid 19 : मंत्री शंभूराज देसाई करोना पॉझिटिव्ह; गृह विलगीकरणात उपचार सुरू
- सावरकर मुद्दा : ठाकरे – राहुल गांधी वादात पवारांची “चलाख” मध्यस्थी; पण नेमकी कशासाठी??
- PAN-Aadhaar linking : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या अंतिम तारीख
- ‘’जनसंघ आणि भाजपला नेस्तनाबूत करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण…’’ पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात!