• Download App
    कर्नाटकमधील हिंदू मंदिरे कायद्याने स्वतंत्र करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा|Hindu temples in Karnataka to be made independent by law, CM announces

    कर्नाटकमधील हिंदू मंदिरे कायद्याने स्वतंत्र करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा


    विशेष प्रतिनिधी

    हुब्बळी : मंदिरांना निधी खर्च करण्यासाठी वारंवार सरकारी अधिकाºयांकडे खेटे लागू नयेत, तसेच स्वतंत्र अस्तित्व टिकावे यासाठी कर्नाटकातील हिंदू मंदिरे कायद्याने स्वतंत्र करणार असल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.Hindu temples in Karnataka to be made independent by law, CM announces

    बसवराज बोम्मई म्हणाले, मंदिरांना स्वतंत्रपणे कामकाज करता यावे यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राज्य सरकार कायदा बनवेल.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोम्मई यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सध्या हिंदू मंदिरांवर वेगवेगळे कायदे आणि नियमांचे नियंत्रण आहे.



    या मंदिरांचे स्वतंत्र अस्तित्व असावे यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी कायदा आणू. अनेक धार्मिक ठिकाणांचे कामकाज वेगवेगळ्या कायद्यांखाली सुरक्षितपणे सुरू आहे आणि त्यांना आराधनेचे स्वातंत्र्यही आहे. परंतु, आमच्या हिंदू मंदिरांचे नियंत्रण नियम आणि कायद्यांनी केलेले आहे.

    तसेच या मंदिरांना त्यांचा स्वत:चा निधीही वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मंदिरांकडील निधी वापरण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाला सरकारी अधिकाऱ्यांची मागावी लागणारी परवानगी बंद झाली पाहिजे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सगळी मंदिरे ही स्वतंत्रपणे कामकाज करतील आणि त्यासाठी आम्ही कायदा करू असे आश्वासन बसवराज बोम्मई यांनी दिली.

    Hindu temples in Karnataka to be made independent by law, CM announces

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार