• Download App
    बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवरील हल्ले अजूनही सुरूच, सरकार हतबल |Hindu temple targeted in Bangakadesh

    बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवरील हल्ले अजूनही सुरूच, सरकार हतबल

    विशेष प्रतिनिधी

    ढाका – बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरावरील हल्ला सत्र अजूनही सुरूच आहे. मुन्शिगंज येथील दानियापारा महा शोशन काली मंदिरावर हल्ला करत सहा मूर्तींची विटंबना केली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात बंदोबस्त वाढवला.Hindu temple targeted in Bangakadesh

    बांगलादेश सरकारने हिंदू मंदिर आणि दुर्गा पूजा मंडपावर हल्ला करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान शेख हसिना यांनी कोमिला प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी केली जात असल्याचे सांगितले आहे.



    दोषींना कडक शिक्षा दिली जाईल, मग तो कोणत्याही धर्माचा असो, असे त्या म्हणाल्या. कोमिला येथील दुर्गा मंडपावर हल्ला झाल्याने चौघांचा मृत्यू झाला होता.काल समाजकंटकांनी मुन्शीगंज येथील दानियापारा महाशोशन काली मंदिरात घुसून सहा मूतींची विटंबना केली.

    मंदिराला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती. त्यामुळे हल्लेखोरांनी मंदिरात गोंधळ घालत मूतींची विटंबना केली. या हल्ल्यात कोणताही व्यक्ती जखमी झालेला नाही. दानियापाराचे सरचिटणीस शुव्रत देव नाथ वासू यांनी सांगितले की, मंदिराचे कुलूप तुटले होते आणि छप्परही फाडले होते.

    Hindu temple targeted in Bangakadesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Economic Survey 2026 : 40% गिग कामगारांची कमाई ₹15 हजारपेक्षा कमी; आर्थिक सर्वेक्षणामध्ये किमान कमाई निश्चित करण्याची शिफारस; प्रतीक्षा कालावधीचे पैसे देण्याचा सल्ला

    India-EU FTA : केंद्राने EUच्या सफरचंदांवर आयात शुल्क कमी केले; 50 ऐवजी 20% केले, हिमाचल सफरचंद उद्योगावर संकट

    Supreme Court : SIR वर सुनावणी- सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; याचिकाकर्ते म्हणाले- ECI मनमानी करू शकत नाही