वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेत यंदा प्रथमच शंभरपेक्षा अधिक शहरांमध्ये दसरा उत्सव साजरा केला जात आहे. परदेशात भारतीयांची लोकसंख्या जसजशी वाढतेय तसे प्रत्येक ठिकाणी भारतीय सण धूमधडाक्यात साजरे होत आहेत. अमेरिकेतील जवळपास सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये रामलीला होत आहे. आधी रावणाचे पुतळे भारतातून आयात केले जात होते, आता अमेरिकेतच पुतळे बनवले जात आहेत. अमेरिकेतील सुमारे अर्ध्याधिक राज्यांमध्ये आणि 40 शहरांमध्ये ऑक्टोबर महिना हा हिंदू संस्कृती-परंपरा महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे.Hindu festivals to be celebrated in more than 100 US cities, funded by the government, October declared the month of Hindu traditions
या वर्षी नवरात्र, दसरा, दुर्गापूजा आणि दिवाळीसारखे महत्त्वपूर्ण सण याच महिन्यात आहेत. त्यामुळे अमेरिकेतील विकासात हिंदूंचे मोलाचे योगदान असल्याने अनेक राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. इंडो-एशियन फेस्टिव्हल ग्रुपच्या अध्यक्ष चंचल गुप्ता म्हणतात, अमेरिकेत जन्मलेल्या आमच्या मुलांना राम आणि सीता यांच्याबद्दल माहिती नाही.
आमच्या नव्या पिढीची भारतीय संस्कृतीशी नाळ जोडण्यासाठी सण-उत्सवांचे आयोजन करीत आहोत. न्यू जर्सी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दसरा उत्सवासाठी निधी दिला आहे. न्यूयॉर्क लाइफ विमा कंपनी, हॉलिडेइन व आयसीआयसीआय बँकेनेही आर्थिक मदत केली आहे. टेक्सास, ओहायो, न्यू जर्सी, पेनसिल्व्हेनियासारखी शहरे आणि राज्य सरकारांनी दसरा उत्सवासाठी सढळ हाताने निधी उपलब्ध करून दिला आहे.
न्यू जर्सीत अनिवासी भारतीयांची संख्या अधिक असल्याने देशातील सर्वात मोठा दसरा उत्सव साजरा केला जातो. यात रामलीला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. 8 ऑक्टोबर रोजी न्यू जर्सी आणि 9 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. रावणाचे पुतळे बनवणारे कृष्णा सिंघल म्हणाले, यापूर्वी 1 पुतळा बनवत होतो, यंदा रावणाचे 6 पुतळे बनवले आहेत.
8 महिने आधीच सुरू होते रामलीलाची तयारी
रामलीलासाठी लागणारे रंगमंच साहित्य अमेरिकेतच तयार होते, परंतु वेशभूषा भारतातून आयात केली जाते. कोरियोग्राफर वर्षा नायक यांनी सांगितले की, प्रत्येक प्रयोगागणिक रामलीला पाहण्यासाठी प्रेक्षकांची संख्या वाढते आहे. तासनतास प्रवास करून लोक येतात. अनेक आठवडे रिहर्सल केली जाते. अनेक वेळा भारतात यावे लागते. त्यामुळे 8 महिने आधीपासूनच रामलीलेसाठी तयारी सुरू केली जाते.
Hindu festivals to be celebrated in more than 100 US cities, funded by the government, October declared the month of Hindu traditions
महत्वाच्या बातम्या
- MPSC मार्फत रिक्त पदांची भरती प्रक्रिया उद्या ३ ऑक्टोबरपासून सुरू; अर्ज करा ऑनलाईन
- इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मृत्यूचा खेळ : स्टेडियममधील चाहते बेकाबू, चेंगराचेंगरीत 129 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
- भारत IT एक्सपर्ट, शेजारचा देशही IT एक्सपर्ट… पण…; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा टोला
- प्रशांत किशोर आज पासून बिहारच्या 3500 किलोमीटर पदयात्रेवर; पण पावले कुणाच्या पावलांवर??