• Download App
    Hindenburg Report सर्व आरोप निराधार, बदनामी करण्याचा प्रयत्न

    Hindenburg Report: ‘सर्व आरोप निराधार, बदनामी करण्याचा प्रयत्न…’, सेबीच्या प्रमुख माधबी बुच यांचे प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने (Hindenburg Report)  गेल्या वर्षी भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप करत अहवाल प्रसिद्ध केला होता, तर यावर्षीही त्यांनी अदानी यांचा समावेश करून बाजार नियामक सेबीला लक्ष्य केले आहे. आपल्या नवीन अहवालात, हिंडेनबर्गने अदानी समूह आणि SEBI प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यातील संबंधांवर दावा करत असा आरोप केला आहे की व्हिसलब्लोअरकडून मिळालेल्या कागदपत्रांवरून असे दिसून येते की SEBI चेअरमन अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोर संस्थांमध्ये सामील होते.

    मात्र, आता याप्रकरणी सेबीच्या प्रमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे, ज्यामध्ये त्यांनी हे सर्व निराधार असून हा केवळ आपली बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

    ‘हिंडेनबर्गच्या आरोपात तथ्य नाही…’

    हिंडेनबर्गने शनिवारी जारी केलेल्या अहवालात दावा केला आहे की व्हिसलब्लोअर दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी 5 जून 2015 रोजी सिंगापूरमध्ये IPE प्लस फंड 1 मध्ये त्यांचे खाते उघडले. यामध्ये जोडप्याची एकूण गुंतवणूक 10 मिलियन डॉलर्स इतकी आहे. हिंडेनबर्गचा आरोप आहे की ऑफशोर मॉरिशस फंड अदानी ग्रुपच्या संचालकाने इंडिया इन्फोलाइनच्या माध्यमातून स्थापन केला होता आणि तो टॅक्स हेवन मॉरिशसमध्ये नोंदणीकृत आहे.

    अमेरिकन शॉर्ट सेलरने केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावत सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी रविवारी सकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 10 ऑगस्टच्या हिंडनबर्ग अहवालात करण्यात आलेले आरोप निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही. माझे जीवन आणि आर्थिक बाबी या खुल्या पुस्तकासारख्या आहेत. आमची जी काही माहिती हवी होती, ती सर्व माहिती गेल्या काही वर्षांत SEBI ला देण्यात आली आहे.



    ‘सेबीच्या कारवाईला प्रतिसाद म्हणून हा प्रयत्न’

    माधबी पुरी बुच पुढे म्हणाल्या की, आम्ही पूर्णपणे सामान्य नागरिक असतानाच्या काळाशी संबंधित असलेल्या कोणत्याही आर्थिक दस्तऐवजांचा खुलासा करण्यास आम्हाला कोणताही संकोच वाटत नाही. कोणताही अधिकारी हे विचारू शकतो. SEBI प्रमुखांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, हिंडनबर्ग रिसर्च, ज्याच्या विरोधात SEBI ने अंमलबजावणी कारवाई केली आहे आणि कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे, त्याला उत्तर म्हणून आता आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला आहे हे दुर्दैवी आहे. त्या म्हणाल्या की आम्ही संपूर्ण पारदर्शकतेने योग्य वेळी तपशीलवार निवेदन जारी करू.

    हिंडेनबर्गच्या अहवालात काय विशेष आहे?

    अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर हिंडेनबर्ग यांनी संशोधन अहवाल दिल्यानंतर 18 महिन्यांनंतर एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी सेबी प्रमुख आणि त्यांच्या पतीवर एक नव्हे तर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी टॅक्स हेवन देश असलेल्या बर्म्युडा आणि मॉरिशसच्या फंडांमध्ये हिस्सा घेतला आणि हे दोन फंड गौतम अदानी यांचे मोठे भाऊ विनोद अदानी यांनीही वापरल्याचा दावा हिंडेनबर्ग संशोधन अहवालात करण्यात आला आहे.

    सल्लागार कंपनीच्या माध्यमातून मोठी कमाई केल्याचा आरोप

    हिंडेनबर्ग अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सेबीने अदानी समूहाशी संबंधित ऑफशोअर भागधारकांविरुद्ध कठोर कारवाई केली नाही, कारण त्यांच्यात संगनमत असू शकते असा आम्हाला संशय आहे. त्यात असे म्हटले आहे की माधबी पुरी बुच या सल्लागार कंपनी, अगोरा ॲडव्हायझरीमध्ये 99% भागधारक होत्या, परंतु 16 मार्च 2022 रोजी SEBI चेअरपर्सन म्हणून नियुक्ती होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी, त्यांनी त्यांचे शेअर्स त्यांचे पती धवल बुच यांच्याकडे हस्तांतरित केले. त्यांचे पती धवल बुच हे या कंपनीचे संचालक आहेत. जर आपण कंपनीच्या वार्षिक अहवालावर नजर टाकली तर, त्यांनी FY2022 मध्ये सल्लामसलत करून 1.98 कोटी रुपये कमावले, जे SEBI चे पूर्णवेळ सदस्य असलेल्या माधबी पुरी बुच यांच्या पगारापेक्षा 4.4 पट जास्त आहे.

    Hindenburg Report All allegations baseless SEBI chief Madhabi Buch’s response

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते