हिमंता यांनी काँग्रेसवर टीका केली आणि ते म्हणाले की हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या राम मंदिराच्या शुद्धीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. हिमंता यांनी काँग्रेसवर टीका केली आणि ते म्हणाले की हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.Himanta Biswa Sarmas criticism of Nana Patoles statement regarding Ram temple in Ayodhya
सरमा म्हणाले की, नाना पटोले म्हटले आहे की, काँग्रेस राम मंदिराचे शुद्धीकरण करेल, याचा अर्थ सोनिया करतील. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या धर्मावर प्रश्न उपस्थित करत सरमा यांनी त्यांना राम मंदिरात जाण्याचा अधिकार आहे का, असा सवाल केला.
नाना पटोले यांनी अतिशय धोकादायक विधान केलंय. सोनिया गांधींचा धर्म कोणता आणि सोनिया गांधी राम मंदिराच्या शुद्धीकरणाचं काम करत असतील तर हिंदू गप्प बसतील का? निवडणुकीचा काळ आहे म्हणून ते हे सर्व बोलत आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगात जातील.
वास्तविक, नाना पटोले यांच्या विधानावर खळबळ उडाली आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की, केंद्रात इंडी आघाडीचे सरकार आल्यावर राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल.
केंद्रात इंडी आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करणार आहोत, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठेला विरोध केला होता, आता चारही शंकराचार्य राम मंदिराचे शुद्धीकरण करून त्यात राम दरबार स्थापन करणार आहेत.
Himanta Biswa Sarmas criticism of Nana Patoles statement regarding Ram temple in Ayodhya
महत्वाच्या बातम्या
- 10 राज्यांतील 96 जागांवर उद्या मतदान; 5 केंद्रीय मंत्री, दोन माजी क्रिकेटपटू रिंगणात; तसेच 5700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत उमेदवारही
- ठाकरे + पवारांचे माध्यमी नॅरेटिव्हचे बाऊन्सर्स; पण त्यावर फडणवीसांची सभांची सेंच्युरी!!
- रिलायन्स कॅपिटल झाले हिंदुजा समूहाचे, ‘IRDAI’नी दिली मंजुरी!
- इंदूरमध्ये काँग्रेस का मागत आहे NOTAसाठी मतं?