मनाली-सोलनमध्ये पावसाने मोडला ५० वर्षांचा विक्रम
विशेष प्रतिनिधी
शिमला : हिमाचल प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनचे उग्र रूप पाहायला मिळत आहे, असे दृश्य यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नव्हते. परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. सर्वत्र जलमय स्थिती असून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Himachal Rain 15 deaths in 24 hours due to rain in Himachal more than 800 roads closed
सोमवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सहा जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे गेल्या २४ तासात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान सहा राष्ट्रीय महामार्गांसह ८२८ रस्ते भूस्खलनामुळे बंद आहेत. तसेच ४६८६ वीज ट्रान्सफॉर्मर आणि ७८५ पाणी योजना बंद पडल्या आहेत. मनाली, सोलन आणि रोहरू येथील पावसाने पूर्वीचे सर्व विक्रम मोडले आहेत.
पावसाचा जोर पाहता सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना सोमवार आणि मंगळवार (10 आणि 11 जुलै) सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय हिमाचल उच्च न्यायालय आणि सर्व जिल्हा न्यायालयांनाही सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Himachal Rain 15 deaths in 24 hours due to rain in Himachal more than 800 roads closed
महत्वाच्या बातम्या
- बाई पण भारी या सिनेमाच्या जोरदार यशानंतर सिनेमाच्या गायिकेचे जोरदार सेलिब्रेशन..
- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गुजरातमधून दाखल केला राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज
- देशाच्या 73% लोकसंख्येवर कोणतेही कर्ज नाही; 5 लाखांपर्यंत कमावणारे 93 कोटी लोक, उत्पन्नापेक्षा त्यांच्या गरजा जास्त
- पोलिसांबद्दल लोकांना आदर आणि आधार वाटायला हवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे