• Download App
    मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनची नियमावली पायदळी; मलाणासारख्या छोट्या गावांमध्ये स्वयंशिस्त लॉकडाऊनमधून शून्य कोरोना पेशंट Himachal Pradesh People of Malana claim zero COVID19 case in village due to self-imposed restrictions

    मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनची नियमावली पायदळी; मलाणासारख्या छोट्या गावांमध्ये स्वयंशिस्त लॉकडाऊनमधून शून्य कोरोना पेशंट

    वृत्तसंस्था

    कुलू (हिमाचल प्रदेश) – संपूर्ण देश कोरोनाशी एकीकडे झुंजत असताना मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना निर्बंध आणि लॉकडाऊनची नियमावली सर्रास पायदळी तुडवली जात आहे. लोक गर्दी करीत आहेत. पण त्याच वेळी मलाणासारखी छोट्या गावांमधील नागरिक स्वयंशिस्त पाळून लॉकडाऊन करीत गावाला संपूर्ण कोरोनामुक्त ठेवत आहेत. Himachal Pradesh People of Malana claim zero #COVID19 case in village due to self-imposed restrictions

    हिमाचल प्रदेशातल्या कुलू जिल्ह्यातील मलाणा गावाचे उदाहरण घेण्यासारखे आहे. मोठ्या शहरांनी त्याचे अनुकरण करायला पाहिजे. मलाणा गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथील अडीच हजार लोकसंख्येपैकी अनेक नागरिक पर्यटनासंबंधी व्यवसाय करतात. पण गेल्या वर्षभरापासून गावकऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन स्वयंशिस्तीने लॉकडाऊन पाळले आहे. त्यामुळे गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही.



    मलाणा परिसरात अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. जमदग्नि ऋषी, माता रेणुका, नरसिंह भगवान आणि आठरा करड़ू का वासस्थान आहेत. पण ग्रामस्थांनी स्थानिक स्वरूपातच पूजा – अर्चा करून पर्यटक आणि भाविकांसाठी मंदिरे बंद ठेवली आहेत. ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपली शेतीप्रधान अर्थव्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी गावाबाहेर जावेच लागत नाही. जायचे असल्यास पंचायतीची परवानगी आणि तपासणी करून जावे लागते. सार्वजनिक कार्यक्रमही स्वयंशिस्त पाळून कमीत कमी लोकांच्या हजेरीत साजरे केले जातात.

    याचा सकारात्मक परिणाम दिसला आहे. देशात कोरोनाचे पेशंट मोठ्या प्रमाणावर वाढत असताना मलाणा गाव आणि त्यातील अडीच हजार नागरिक मात्र कोरोनामुक्त राहिले आहेत.

    मुंबई, हैदराबादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये लोकांनी कोरोनाची नियमावली पायदळी तुडविली आहे. लोक अनावश्यक गर्दी करून कोरोना फैलावास कारणीभूत ठरत आहेत. या मोठ्या शहरांमधील नागरिकांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनी मलाणा गावाचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे.

    Himachal Pradesh People of Malana claim zero COVID19 case in village due to self-imposed restrictions

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही