• Download App
    हिमालयाच्या पर्वतरांगा पर्यंटकांच्या स्वागतासाठी सज्ज, हिमाचल प्रदेशातील पर्यटन खुले Himachal pradesh opens for tourist

    हिमालयाच्या पर्वतरांगा पर्यंटकांच्या स्वागतासाठी सज्ज, हिमाचल प्रदेशातील पर्यटन खुले

    विशेष प्रतिनिधी

    सिमला – हिमालयाच्या पर्वतरांगात विसावलेले निसर्गरम्य हिमाचल प्रदेश आता पर्यटकांच्या स्वागतासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या पर्वतरांगात फिरण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या पर्यटकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. Himachal pradesh opens for tourist

    कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने पर्यटन व्यवसाय राज्यात पुन्हा बहाल करण्यासाठी येत्या १ जुलैपासून ई-पास शिवाय पर्यटकांना राज्यात येण्याची मुभा दिली आहे. याशिवाय आंतरराज्य बस सेवा देखील सुरू होत असून ५० टक्के क्षमतेसह बस धावणार आहेत.



    कोरोनामुळे बराच काळ घरातच बसून असलेल्या नागरिकांना आता हिमाचलच्या पर्वतरांगात बिनदिक्कत जाता येणार आहे. राज्यातील रुग्णसंख्येत झालेली घट पाहता ई.-पासचे बंधन काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला.येत्या १ जुलैपासून ५० टक्के क्षमतेने आंतरराज्य बससेवा सुरू होत असून ई.-पास प्रणाली बंद केली जाणार आहे.

    तसेच सरकारी कार्यालयांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे बराच काळ ओस पडलेली सरकारी कार्यालय आता गजबजणार आहेत. याशिवाय राज्यातील दुकान सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट रात्री दहा पर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

    Himachal pradesh opens for tourist

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत