रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पोटात दुखणे तसेच सूज असल्याचे तपासात समोर आले.
विशेष प्रतिनिधी
शिमला : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांची प्रकृती खालावली आहे, त्यानंतर त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (IGMC शिमला) दाखल करण्यात आले आहे. Himachal Chief Minister Sukhu admitted to IGMC in Shimla due to deteriorating health
मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री सखू यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. IGMC शिमला यांनी सुखविंदर सिंग सुखू हे रुग्णालयात दाखल झाले असल्याची पुष्टी केली आहे.
IGMC शिमलाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल राव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना पोटाच्या संसर्गामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्ट्रासाऊंड रिपोर्ट नॉर्मल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या असून अहवाल सामान्य आहेत. आम्ही त्यांना निरीक्षणाखाली ठेवले असून अधिक तपास करत आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 2.30 च्या सुमारास सखू यांना पोटात दुखू लागले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पोटात दुखणे तसेच सूज असल्याचे तपासात समोर आले. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना IGMC च्या विशेष वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाच महिन्यांपूर्वीही सखू यांच्यावर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. पाय दुखत असल्याच्या तक्रारीनंतर ते तपासणीसाठी येथे आले होते.
Himachal Chief Minister Sukhu admitted to IGMC in Shimla due to deteriorating health
महत्वाच्या बातम्या
- प्राजक्ता माळीने सांगितले संघाच्या दसरा मेळाव्याला जाण्याचे कारण!
- कॅनडाशी सुधारू लागले संबंध! आजपासून भारत पुन्हा सुरू करणार व्हिसा सेवा
- Online Gaming : ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना केंद्राने सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या कर नोटीस पाठवल्या
- 22 जानेवारी 2024 : राम जन्मभूमी मंदिर उद्घाटनाचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण!!