• Download App
    गोष्ट 0.1 सेकंदाची : हिमा दास आणि पी. टी. उषा यांची पदके हुकल्याची!! Hima Das and P. T. Usha lost her medals

    गोष्ट 0.1 सेकंदाची : हिमा दास आणि पी. टी. उषा यांची पदके हुकल्याची!!

    विनायक ढेरे

    भारताची सध्याची स्प्रिंट क्वीन हिमा दास राष्ट्रकुल स्पर्धेत 2022 मध्ये 200 मीटर स्पर्धेत फायनलला जाऊ शकली नाही. अवघ्या 0.1 सेकंदाने तिची फायनलची फेरी हुकली. त्यामुळे ती प्रचंड निराश झाली आहे. सोशल मीडियावर देखील अनेक क्रीडाप्रेमींनी हिमा दास फायनलला पोचू शकली नाही याबद्दल खंत व्यक्त केली आहे. पण खेळात अशी हार जीत चालायचीच. शिवाय सेकंदाच्या शतांश भागाने पराभव पत्करावी लागलेली हिमा दास ही एकटीच स्प्रिंग क्वीन नाही. तिच्याआधी देखील परदेशातल्या अनेक खेळाडूंना असा पराभव सहन करावा लागला आहे… पण असाच एक महान पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला होता, तो भारताची सर्वात गाजलेली स्प्रिंट क्विन आणि आजची राज्यसभा खासदार पी. टी. उषा हिचा!! Hima Das and P. T. Usha lost her medals

     1984 लॉस एंजलिस ऑलिंपिक 

    पी. टी. उषा ही 1980 च्या दशकात भारताची प्रिंट क्वीन होती. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तिचे निर्विवाद वर्चस्व होते. किंबहुना ती ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंट मधली भारताची सुवर्णकन्या होती. पण दुर्दैवाने 1984 च्या लॉस एंजलिस ऑलिंपिक मध्ये तिच्या वाट्याला आजचीच हिमा दास हिची निराशा आली होती.

    1982 च्या नवी दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंट सुवर्णपदक जिंकून पी. टी. उषाने भारतीयांच्या मनामध्ये प्रचंड आशा जागवली होती. ती प्रचंड फॉर्ममध्ये होती. त्यामुळे अर्थातच 1984 च्या लॉस एंजलिस ऑलिंपिक मध्ये ती भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणार याकडे समस्त भारतीयांचे डोळे लागले होते. तिने चमकदार कामगिरी करत आशियाई आणि कॉमनवेल्थ रेकॉर्ड तोडत लॉस एंजलिस ऑलिंपिक मध्ये फायनल मध्ये प्रवेशही केला होता. परंतु तिथे तिचे दुर्दैव आड आले आणि तिने 0.1 सेकंदामध्येच आपले ऑलिंपिक कास्यपदक गमावले होते.

    रंगीत टीव्हीवर लाईव्ह प्रदर्शन

    त्यावेळी आधीच भारताकडे ऑलिंपिक मध्ये पदकांचा दुष्काळ होता. हॉकी वगळता एकाही खेळात भारताला ऑलिंपिक मध्ये तेव्हा पदक मिळायचे नाही. परंतु पी. टी. उषाने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीयांची ऑलिंपिक पदक मिळवण्याची आशा प्रज्ज्वलित केली होती. त्यावेळी रंगीत टीव्ही नुकताच आला होता. त्यामुळे तिच्या परफॉर्मन्सचे लाईव्ह बघणे आणि तोही रंगीत टीव्हीवर, हा भारतीयांसाठी प्रचंड पर्वणीचा दिवस होता. समस्त भारतीयांचे डोळे पी. टी. उषाच्या फायनल शर्यतीकडे लागले होते आणि तिने ती शर्यत तिसऱ्या क्रमांकाने पूर्ण केल्याने भारतीयांना आनंदाचे भरते आले होते. परंतु, दुर्दैवाने पी. टी. उषाच्या वेळ 0.1 सेकंदाने तिसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकांपेक्षा जास्त ठरला आणि ती चौथ्या नंबर वर राहिली.

     हिमा दासचे भवितव्य उज्वल

    खुद्द पी. टी. उषा बरोबरच त्यावेळी समस्त भारतीयांची निराशा झाली होती. आज हिमा दास अशीच 0.1 सेकंदाने हरली आहे. ती निराश होणे स्वाभाविक आहे. परंतु खेळात अशी हार जीत चालायचीच. हे स्वीकारून पी. टी. उषा जशी पुढे गेली आणि आशियाई क्वीन म्हणून गाजली तशीच हिमा दास देखील गाजणार आहे यात शंका नाही. आज हिमा दासची फायनल मधली एन्ट्री 0.1 सेकंदांनी हुकली. या निमित्ताने पी टी उषाच्या 0.1 सेकंदाच्या पदक गमावल्याच्या घटनेची आठवण झाली इतकेच!!

    Hima Das and P. T. Usha lost her medals

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!