वृत्तसंस्था
बेंगलुरू : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. या हिजाब बंदीच्या मोठ्या निर्णयानंतर कर्नाटक सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. हा निर्णय म्हणजे कर्नाटक सरकार टिपू सुलतानचा गौरव करणारे धडे बदलणार आहे. Hijab Tipu Sultan: After hijab ban, Tipu Sultan’s “Gaurav Path” will be removed from school curriculum in Karnataka !!
कर्नाटक सरकार शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा करणार आहे. या प्रक्रियेत 18 व्या शतकातील शासक टिपू सुलतानचा “गौरव” करणाऱ्या अध्यायांवर अधिक लक्ष दिले जाणार असल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे, हिजाब वाद आणि हिंदू मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापार्यांवर बंदी यावरून सरकारला आधीच टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता शिक्षणाशी संबंधित आणखी एका मुद्द्यावरून सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
टिपू सुलतानचा गौरव करणारा भाग वगळणार?
समितीने राज्य पुस्तकांमध्ये विशेषतः टिपू सुलतानशी संबंधित असलेल्या पुस्तकांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली असल्याचे कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले. चर्चेनंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार असून अद्याप या प्रक्रियेची माहिती नाही. अहवालात 18 व्या शतकातील शासक टिपू सुलतानवरील इतिहासाचे धडे बदलण्याचा प्रस्ताव असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समितीने टिपू सुलतानवरील धडे सुरू ठेवण्यास सांगितले आहे. तर, टिपू सुलतानचा गौरव करणारा भाग काढून टाकण्याची सूचना केली आहे. मात्र, कोणते भाग काढले जाणार हे अद्याप समोर आले नाही.
Hijab Tipu Sultan : After hijab ban, Tipu Sultan’s “Gaurav Path” will be removed from school curriculum in Karnataka !!
महत्त्वाच्या बातम्या
- मोफत रेशन योजना तीन महिन्यांसाठी वाढवली; योगी आदित्यनाथ सरकारचा पहिलाच निर्णय
- पंजाबमध्ये महिला क्लर्कने लाच मागितल्याची तक्रार, मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या दिल्या सूचना
- अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण; तातडीने सीमाप्रश्न सोडविण्याचा आग्रह
- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकर उलटला; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा
- आमने सामने : फारुख अब्दुल्लाचा स्वतःला निर्दोष दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पल्लवी जोशींनी हाणून पाडला ..म्हणाल्या २दिवस आधी राजीनामा अन् लंडन वारी हा योगायोग नव्हे ….
- कामावर हजर व्हा,एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा अखेरचा इशारा : ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा
- स्वाभिमानी पक्षाच्या एकमेव आमदाराला डच्चू; सक्रिय नसल्याने पक्षातून केली हकालपट्टी