• Download App
    Hijab Controversy : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूचे हिजाबच्या समर्थनाचे वक्तव्य!!|Hijab Controversy: Miss Universe Harnaj Kaur Sandhu's statement in support of hijab

    Hijab Controversy : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूचे हिजाबच्या समर्थनाचे वक्तव्य!!

    वृत्तसंस्था

    चंदीगड : देशभरात हिजाबचा वाद पेटला असताना तसेच कर्नाटक हायकोर्टाने शाळा-महाविद्यालयांमध्ये गणवेश महत्त्वाचा, हिजाब नव्हे, असा स्पष्ट निकाल दिला असताना मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू हिने हिजाबचे समर्थन करणारे वक्तव्य केले आहे.Hijab Controversy: Miss Universe Harnaj Kaur Sandhu’s statement in support of hijab

    पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची भेट

    मिस युनिव्हर्स किताब जिंकल्यानंतर हरनाज भारतात परतली तिने चंदीगडमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. यावेळी तिच्या समावेत तिचे पालक आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे उमेदवार राघव चढ्ढा हे मुख्यमंत्री निवासस्थानात उपस्थित होते. मिस युनिव्हर्स किताब जिंकल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतल्याचे हरनाज कौर हिने सांगितले.



    हिजाबचा अधिकार मान्य करावा

    त्यानंतर हिजाबच्या वादाबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला. हिजाब वादासंदर्भात हरनाज कौर म्हणाली, की एखाद्या मुलीला हिजाब परिधान करायचा असेल तर तो तिचा अधिकार आहे. त्या अधिकारात कोणी हस्तक्षेप करू नये. कोणी वर्चस्व गाजवायचे प्रयत्न करत असेल तर तिने पुढे येऊन बोलले पाहिजे. मूळात आपण सर्व भारतीय विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आपण एकमेकांच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. हिजाब परिधान करण्याचा अधिकार एखादीला आपला वाटत असेल तर तो आपण मान्य केला पाहिजे, असे वक्तव्य हरनाज हिने केले आहे.

    हिजाब बंदीवर कर्नाटक हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

    कर्नाटक हायकोर्टाने शाळा आणि महाविद्यालयात हिजाब बंदी योग्य असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. मात्र त्या विरोधात काही मुस्लीम संघटना सुप्रीम कोर्टात गेल्या आहेत. परंतु सुप्रीम कोर्टाने देखील सुनावणीच्या वेळी परीक्षा आणि हिजाब यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असे परखड मत नोंदवले आहे.

    मात्र, अद्याप सुप्रीम कोर्टाने हिजाब वादाबद्दल अंतिम निर्णय दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मिस युनिव्हर्स सारखा किताब जिंकणारी हरनाज कौर संधू हिने हिजाब समर्थनाचे वक्तव्य करणे अजब मानले जात आहे. सोशल मीडियातून तिच्यावर टीकाटिपणी सुरू झाली आहे.

    Hijab Controversy: Miss Universe Harnaj Kaur Sandhu’s statement in support of hijab

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!