कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी आहे. कुंदापुरा येथील शासकीय प्री युनिव्हर्सिटी कॉलेजच्या आवारात सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी हिजाब परिधान केलेल्या मुलींना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, पुन्हा नवीन वाद निर्माण होऊ नये म्हणून त्यांना स्वतंत्र वर्गात शिकवले जाईल. Hijab Controversy Hijab girl students allowed to enter college campus in Karnataka, but class will be different
वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी आहे. कुंदापुरा येथील शासकीय प्री युनिव्हर्सिटी कॉलेजच्या आवारात सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी हिजाब परिधान केलेल्या मुलींना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, पुन्हा नवीन वाद निर्माण होऊ नये म्हणून त्यांना स्वतंत्र वर्गात शिकवले जाईल.
राज्यातील उडुपीमधील काही महाविद्यालयांनी मुस्लिम विद्यार्थिनींना त्यांच्या वर्गात हिजाब घालण्यास बंदी घातली तेव्हापासून हा वाद सुरू झाला. शनिवारी काँग्रेस आमदार कनीज फातिमा यांनी त्यांच्या समर्थकांसह याविरोधात निदर्शने केली. यानंतर रविवारी रात्री पोलिसांनी कॉलेजजवळून काही शस्त्रे घेऊन आलेल्या लोकांना अटक केली. आरोपी रजब आणि हाजी अब्दुल मजीद यांच्याकडून धारदार शस्त्रे सापडली आहेत. त्यांच्यासह काही जण फरार आहेत.
त्याचवेळी शनिवारीच राज्याच्या शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. राज्य सरकारने जाहीर केलेल्या युनिफॉर्म ड्रेस कोडचे सर्व सरकारी शाळांनी पालन करावे, असे शिक्षण विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर खासगी संस्थांच्या विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या ड्रेस कोडचे पालन करावे. ड्रेसकोड नसेल तर विद्यार्थ्यांनी समानता, अखंडता आणि कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होणार नाही असे कपडे परिधान करावेत.
कर्नाटकात हिजाब परिधान करण्यावरून उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात वाद सुरू झाला होता. येथील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींच्या एका गटाला हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. ड्रेसमध्ये समानता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. हिजाबच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी भगवे गमछ परिधान करून संस्थांमध्ये पोहोचू लागले.
Hijab Controversy Hijab girl students allowed to enter college campus in Karnataka, but class will be different
महत्त्वाच्या बातम्या
- धर्म संसदेतील अतिरेकी वक्तव्यांबाबत डॉ. मोहन भागवत असहमत; सावरकरांच्या हिंदुत्वात देशाच्या एकात्मतेची धारणा!!
- केरळच्या महिलेने जिंकली कोट्यवधी रुपयांची लॉटरी; तब्बल ४४.७५ कोटींचा मिळाला फायदा
- कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा आधारस्तंभ हरपला; सुधीर कलिंगण यांचे आजाराने निधन
- हुंडाईच्या पाकिस्तानी शाखेची मस्ती, स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार!! #Boycott hudai ट्रेंडनंतर हुंडाईच्या भारत शाखेकडून पाकिस्तानी शाखेचा निषेध!!