Hijab Controversy : भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केंद्र आणि राज्यांनी शाळांसाठी समान ड्रेस कोड लागू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी इतर आवश्यक पावले उचलण्याची मागणीही त्यांनी केली आहे. Hijab Controversy BJP leader petition in Supreme Court – Center and states demand implementation of common dress code for schools
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केंद्र आणि राज्यांनी शाळांसाठी समान ड्रेस कोड लागू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी इतर आवश्यक पावले उचलण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
कालच युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांनी मुस्लिम मुलींना हिजाब घालण्याच्या मूलभूत अधिकाराचा दर्जा देण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास हिजाब प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या महिन्यात उडुपी गव्हर्नमेंट प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या काही विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर हिजाबचा वाद सुरू झाला, ज्यांना वर्गात जाण्याची परवानगी नव्हती. कॉलेजच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जे विद्यार्थी पूर्वी हिजाबशिवाय यायचे, ते आता अचानक हिजाब घालून यायला लागले आहेत. नंतर विद्यार्थिनींनी हिजाबशिवाय वर्गात जाण्यास नकार देत निषेध केला. हा मुद्दा वादात सापडला असून कर्नाटकातील इतर जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तणाव निर्माण होऊन हिंसाचारही झाला.
कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब विवाद प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी करताना अंतिम आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही धार्मिक चिन्हाला परवानगी नसल्याचा आदेश दिला होता.
Hijab Controversy BJP leader petition in Supreme Court – Center and states demand implementation of common dress code for schools
महत्त्वाच्या बातम्या
- संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रीत झालेला पहिला मराठी सिनेमा घडविणारं ‘पाँडीचेरी’ची सैर
- पंधरा हजार नागरिकांनी घेतला आधार सुविधा केंद्राचा लाभ; दिव्यांग आधार व सुविधा केंद्राची द्विवर्षपूर्ती
- अनिल देशमुख यांच्या सीएच्या कार्यालयावर ईडीचे छापे
- डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण सन्मानार्थ सत्कार; रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचा कार्यक्रम
- कोरोनाविरोधी लसीच्या सक्तीला तीव्र विरोध; कॅनडात ट्रकचालकांचे चक्क जाम आंदोलन