विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जपान आणि अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला आहे. जपानमध्ये गेल्या चाळीस वर्षांतील सर्व विक्रम महागाईने मोडीत काढले आहेत. महागाई वाढल्याने जपानमधील सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.High inflation in Japan, US, big economic blow to the common man
जपानमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू आयात केल्या जातात. मात्र, सध्या जपानी चलन असलेल्या येनचे मूल्य डॉलरच्या तुलनेमध्ये घसरले आहे. चलनामध्ये झालेल्या घसरणीमुळे आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यामुळे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता असलेला जपान संकटात सापडला आहे.
इकोनॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रमुख असलेल्या अत्सुशी टाकेडा यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, सध्या वाढती महागाई ही जपानमधील एक प्रमुख समस्या बनली आहे. महागाईने गेल्या चाळीस वर्षांतील सर्व विक्रम तोडले आहेत. वस्तूंच्या किमती वाढत असल्याने साठेबाजीची शक्यता नाकारता येत नाही.
व्यापाºयांनी वस्तूंची साठेबाजी केल्यास, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत महागाई आणखी वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, वाढत्या महागाईबाबत सरकार गंभीर असून, ती कमी करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलली जात असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत.
अमेरिकेतही महागाई दराने ३० वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. महागाई दर वार्षिक आधारावर ६.२ टक्क्यांवर पोहोचल्याने अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून आधीच्या अंदाजापेक्षा खूप लवकरच व्याजदरात वाढ केली जाणे अपेक्षित आहे.
High inflation in Japan, US, big economic blow to the common man
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!