• Download App
    बलात्कार पीडितेच्या बाळाच्या DNA चाचणीस हायकोर्टाचा नकार, पीडितेने प्रसूतीनंतर बाळ दत्तक दिले High Court rejects DNA test of rape victim's baby, victim adopts baby after delivery

    बलात्कार पीडितेच्या बाळाच्या DNA चाचणीस हायकोर्टाचा नकार, पीडितेने प्रसूतीनंतर बाळ दत्तक दिले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दत्तक घेतल्यानंतर बलात्कार पीडितेच्या बाळाची डीएनए चाचणी करणे योग्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे करणे मुलाच्या आणि त्याच्या भविष्याच्या हिताचे नाही. न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्या एकल खंडपीठाने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर करताना ही टिप्पणी केली. High Court rejects DNA test of rape victim’s baby, victim adopts baby after delivery

    बलात्कारानंतर मुलगी गरोदर राहिल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यावर न्यायालयाने मुलाची डीएनए चाचणी केली आहे का, अशी विचारणा केली. पोलिसांनी सांगितले की, प्रसूतीनंतर मुलीने मूल दत्तक देण्यासाठी एका संस्थेकडे दिले होते.

    तिथून कोणीतरी बलात्कार पीडितेचे मूल दत्तक घेतले. ते दत्तक घेतलेल्या पालकांबाबत संस्थेने पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, संघटनेने असे करणे पूर्णपणे योग्य आहे.



    बलात्कार पीडितेची ओळख सांगता कामा नये, मृत्यू झालेला असला तरी : सुप्रीम कोर्ट

    सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, बलात्काराच्या प्रकरणांमध्ये पीडितेचे नाव आणि ओळख जाहीर करता कामा नये. पीडितेचा मृत्यू झाला असेल तरी ओळख जाहीर करायला नको. कारण मृताचाही एक प्रकारचा सन्मान असतो. जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये अत्याचारानंतर हत्या करण्यात आलेल्या आठ वर्षीय पीडिता आणि इतर पीडितांची ओळख जाहीर केल्याप्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हे म्हणणे मांडले.

    नाव, ओळख जाहीर न करता व्हावी मीडिया रिपोर्टींग

    अत्याचाराच्या प्रकरणांच्या रिपोर्टिंगबाबत सुप्रीम कोर्टाने म्हटले की, मृत्यानंतरही पीडितेचा सन्मान राखला जावा. मीडिया रिपोर्टिंग नाव आणि ओळख जाहीर न करता तसेच पीडितेचा सन्मान कायम राहील याची काळजी घेऊन व्हायला हवी. सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले की, पीडिता जीवीत आणि किशोरवयीन असेल किंना मानसिक रुग्ण असेल तरी तिचा ओळख जाहीर करता कामा नये. कारण तिलाही खासगी आयुष्य असते.

    High Court rejects DNA test of rape victim’s baby, victim adopts baby after delivery

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य