विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद – गुजरातमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सरकारचे दावे आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत आहे. लोकांनाही असेच वाटतेय की ते देवाच्या दयेवर जिवंत आहेत, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. High Court lashes on Gujarat govt.
मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्या. भार्गव कारिया यांच्यापुढे सुनावणी झाली. तुमच्याकडे रेमेडेसिव्हिर औषधाचा देखील तुटवडा नाही, प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे उपलब्ध आहे. आता आम्हाला थेट काम पाहायचे आहे.
तुम्ही कारणे सांगत बसू नका, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आताही आरटी-पीसीआर चाचणी केल्यानंतर अहवाल मिळण्यासाठी लोकांना पाच दिवस वाट पाहावी लागते. याचा अर्थच तुम्ही चाचणी केंद्रे वाढविली नाहीत, असा होतो असे न्यायालयाने स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेते भितीचे व काळजीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले.