• Download App
    तमिळ सुपरस्टार थलपती विजयला मद्रास उच्च न्यायालयाचा दणका, करासोबतही दंडही भरण्याचा आदेश|High court fined Thalpati vijay

    तमिळ सुपरस्टार थलपती विजयला मद्रास उच्च न्यायालयाचा दणका, करासोबतही दंडही भरण्याचा आदेश

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई  : तमिळनाडूतील सर्वाधिक महाग अभिनेता थलपती विजय याला मद्रास उच्च न्यायालयाने झटका देत एक लाख रुपये दंड भरण्याचा आदेश दिला. इंग्लंडमधून आयात केलेल्या रोल्स रॉईस या आलिशान मोटारीवरील कराविरोधात विजयने उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.High court fined Thalpati vijay

    ती न्यायालयाने फेटाळलीच शिवाय एक लाख रुपयांच्या दंड ठोठावत ही रक्कम तमिळनाडूच्या मुख्यमंत्री कोरोना सहाय्य निधीत दोन आठवड्यात जमा करण्याचा आदेशही दिला आहे. विजय याची याचिका फेटाळताना न्यायाधीश एस.एम. सुब्रह्मण्यम म्हणाले की, प्रतिष्ठीत अभिनेत्याने कर भरणा त्वरित आणि वेळेवर करणे अपेक्षित आहे.



    अभिनेत्यांचे चाहते त्यांना खऱ्या हिरोप्रमाणे मानतात. तमिळनाडूसारख्या राज्यात जेथे चित्रपट अभिनेते राज्यकर्ते बनले आहेत. अशा वेळी त्यांनी केवळ पडद्यावरील हिरोप्रमाणे वागावे, असे अपेक्षित नाही. असेही न्यायाधीशांनी विजयला सुनावले.

    विजयने २०१२ मध्ये रोल्स रॉईस घोस्ट ही जगातील महागडी मोटार इंग्लंडहून भारतात आयात केली होती. सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या मोटारीवर २० टक्के प्रवेश करातून सूट मिळण्यासाठी त्याने याचिका दाखल केली होती.

    High court fined Thalpati vijay

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे