सध्या हेमंत सोरेन हे होटवार कारागृहात आहेत . Hemant Soren shocked again Interim bail rejected by ED court
विशेष प्रतिनिधी
नवा दिल्ली : माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तात्पुरता जामीन देण्याची विनंती ED कोर्टात केली आहे. मात्र, ईडी कोर्टाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला. न्यायालयाने हेमंत सोरेन यांची याचिका फेटाळली.
जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. सध्या ते होटवार कारागृहात आहे. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यांचे मोठे काका राजाराम सोरेन यांचे निधन झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे त्यांना अंत्यसंस्कारासाठी 13 दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
यापूर्वी हेमंत सोरेन यांच्या वतीने २४ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेत ईडीच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी निर्णय राखून ठेवला होता.
Hemant Soren shocked again Interim bail rejected by ED court
महत्वाच्या बातम्या
- घुसखोरांना एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव – केशव प्रसाद मौर्य
- मोदी म्हणाले कदाचित मी मागील जन्मी इथेच जन्मलो असेल, नाहीतर…
- भाजप खासदार रवी किशन यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा!
- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!