हेलिकॉप्टरचा पायलट हेलिकॉप्टरमधून उडी मारण्यात यशस्वी झाला आणि बचावला. Helicopter crash before taking Thackeray group leader Sushma Andharen to Raigad for a meeting
विशेष प्रतिनिधी
रायगड : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना सभेला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये कोसळले. सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये चढण्याआधीच हेलिकॉप्टर कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईव्ह रेकॉर्ड झाला आहे.
सुषमा अंधारे यांनी स्वतः अपघाताचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. काल त्यांची महाडमध्ये सभा होती. रात्र झाली म्हणून त्या तिथेच थांबल्या होत्या. आज त्यांना दुसऱ्या भेटीच्या ठिकाणी नेण्यासाठी हेलिकॉप्टर आले होते.
अंधारे यांनी शेअर केलेल्या लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंगनुसार, सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले खासगी हेलिकॉप्टर लँडिंग करताना अचानक कोसळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. हेलिकॉप्टरचा पायलट हेलिकॉप्टरमधून उडी मारण्यात यशस्वी झाला आणि बचावला.