• Download App
    सलमान खुर्शीद यांच्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामशी केल्याचा आरोप । Hearing on the publication and sale of Salman Khurshid's book today, Delhi High Court may pronounce its verdict

    सलमान खुर्शीद यांच्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामशी केल्याचा आरोप

    माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. अॅडव्होकेट विनीत जिंदाल यांनी त्यांचे वकील राज किशोर चौधरी यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. Hearing on the publication and sale of Salman Khurshid’s book today, Delhi High Court may pronounce its verdict


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. अॅडव्होकेट विनीत जिंदाल यांनी त्यांचे वकील राज किशोर चौधरी यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना कट्टर दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसारख्या गटांशी केली आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून असे दिसते की हिंदू धर्माची आयएसआयएस आणि बोको हरामशी तुलना केली गेली आहे.



    संपूर्ण हिंदू समाजासाठी हे अत्यंत प्रक्षोभक आणि बदनामीकारक विधान असल्याचेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे. याचिकेत म्हटले आहे की, या पुस्तकात लिहिलेल्या मजकुरावरून असे दिसते की समाजातील त्यांच्या मूल्यांवर आणि गुणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.

    खुर्शीद यांच्या पुस्तकावरन नवा वाद

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून देशभरात मोठा वाद सुरू आहे. पुस्तकाची माहिती समोर आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. त्याचवेळी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याचे संकेत दिले होते.

    ‘मध्य प्रदेशात पुस्तकांची विक्री होऊ देणार नाही’

    नरोत्तम मिश्रा यांनी सलमान खुर्शीद यांचे पुस्तक मध्य प्रदेशात विकू दिले जाणार नाही, असे विधान केले होते. यावर बंदी घालण्यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले होते. काँग्रेसवर आरोप करताना ते म्हणाले होते की, त्यांचे (काँग्रेस) नेते तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत.

    Hearing on the publication and sale of Salman Khurshid’s book today, Delhi High Court may pronounce its verdict

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य