corona vaccines : काही राज्ये कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी जागतिक निविदा काढत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की आतापर्यंत 22,77,62,450 लसीचे डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत आणि थेट राज्य खरेदीद्वारे देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 4 लाखांपेक्षा जास्त डोस तयार असून येत्या तीन दिवसांत ते राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. health ministry says states and uts to get four lakh corona vaccines in next three days
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काही राज्ये कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी जागतिक निविदा काढत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की आतापर्यंत 22,77,62,450 लसीचे डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत आणि थेट राज्य खरेदीद्वारे देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 4 लाखांपेक्षा जास्त डोस तयार असून येत्या तीन दिवसांत ते राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले.
मंत्रालयाने म्हटले आहे की, 1,82,21,403 पेक्षा जास्त डोस अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत, जे अद्याप लोकांना देण्यात आलेले नाहीत. यापैकी निकामी डोससह एकूण वापर 20,80,09,397 आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार शुक्रवारी देशभरात 28.92 लाख डोस देण्यात आले. त्याचबरोबर 16.45 कोटी लोकांना प्रथम डोस देण्यात आला आहे आणि आतापर्यंत 4.04 कोटींपेक्षा जास्त लोकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. 1 मेपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाअंतर्गत 18-44 वयोगटातील 1.66 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.
health ministry says states and uts to get four lakh corona vaccines in next three days
महत्त्वाच्या बातम्या
- CRPFचे महासंचालक कुलदीप सिंह यांना NIAचा अतिरिक्त प्रभार, वायसी मोदींची जागा घेणार
- कोरोनाची लस घ्या अन् 14 लाख डॉलरचे घर मिळवा चकटफू!, हाँगकाँगमध्ये अनोखी ऑफर
- तामिळनाडूत कोरोनामुळे आईवडिलांना गमावलेल्या बालकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांची घोषणा
- मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले- दिल्लीत कोरोनाचे केवळ 900 नवीन रुग्ण आढळले, राजधानी आणखी अनलॉक करणार
- IPL चे उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; टी -20 वर्ल्डकपच्या निर्णयासाठी ICC ला जूनपर्यंत मागणार मुदत