केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी आज इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्टर्स समिटमध्ये जेनेरिक औषधांबाबत मोठे विधान केले आहे. जेनेरिक औषधांचा भारत आज सर्वात मोठा उत्पादक आणि पुरवठादार बनल्याचे ते म्हणाले. Health minister mandaviya said india is largest producer of generic medicines, taking steps towards providing cheap medicines to the world
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी आज इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्टर्स समिटमध्ये जेनेरिक औषधांबाबत मोठे विधान केले आहे. जेनेरिक औषधांचा भारत आज सर्वात मोठा उत्पादक आणि पुरवठादार बनल्याचे ते म्हणाले.
मंडाविया म्हणाले की, आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम’ मानतो. जगाला स्वस्तात औषधे मिळण्याच्या दिशेने आम्ही पावले उचलली आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा संदर्भ देत आरोग्यमंत्री म्हणाले, जेव्हा कोविड-१९ ची पहिली लाट आली तेव्हा जगात (कोरोना) औषधे नव्हती. आम्ही आमची परिस्थिती तर नियंत्रणात आणलीच, आमच्या स्वतःच्या औषधांच्या गरजाही पूर्ण केल्या, शिवाय 150 हून अधिक देशांना औषधांचा पुरवठाही केला. ही आमची बांधिलकी आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान मंगळवारी त्यांनी देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवर भाष्य केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी सरकार आरोग्य केंद्रे सुरू करण्यावर भर देत आहे. लोकांना माफक दरात उपचार मिळावेत हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. यासोबतच आरोग्यमंत्र्यांनी भारतात आढळलेल्या AY.4.2 या धोकादायक नवीन प्रकाराबद्दलही सांगितले. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांवर उपचार आणि प्राथमिक स्तरावरील तपासणीसाठी आम्ही १,५०,००० आरोग्य आणि कल्याण केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. देशात ७९,००० हून अधिक आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या जागा जवळपास दुप्पट झाल्या आहेत. लोकांना परवडणारे उपचार मिळावेत यासाठी आम्ही सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून काम केले. नवीन कोरोना प्रकाराबाबत आरोग्य मंत्री म्हणाले की ICMR आणि NCDC नवीन AY.4.2 प्रकाराचा अभ्यास करत आहेत.
कोवॅक्सीनला लवकरच मंजुरी
नुकतेच उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झिका विषाणूचे प्रकरण समोर आले आहे. मनसुख मंडाविया म्हणाले की, कानपूरमध्ये झिका विषाणू आढळल्याच्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. एक पथक त्याचा तपास करत आहे. त्याच वेळी, भारताच्या लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलेली नाही. यावर बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, WHO कडे एक यंत्रणा आहे, ज्यामध्ये एक तांत्रिक समिती आहे, त्यांनी लसीला मान्यता दिली आहे, तर दुसऱ्या समितीची आज बैठक होत आहे. आजच्या बैठकीच्या आधारे कोवॅक्सिनला मान्यता दिली जाईल.
Health minister mandaviya said india is largest producer of generic medicines, taking steps towards providing cheap medicines to the world
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मी्र खोऱ्यात ग्रेनेड हल्ल्यात ६ जखमी, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
- चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा लागला वाढू, लांझोऊ शहरात लॉकडाउन
- साक्षीदारांना संरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारला आदेश
- बंगळूरमधील रोहिंग्यांच्या हद्दपारीची योजना नाही , कर्नाटकची न्यायालयात माहिती
- अफगाणिस्तानला मदत पाठवण्याचे आता इम्रान, जीनपिंग यांचे थेट जगालाचा साकडे