• Download App
    कोरोना आयसोलेशनसाठी ११ दिवस तो राहिला झाडावर, कुटुंबाला संसर्ग नको म्हणून विद्यार्थ्याचे दिव्य He stayed on the tree for 11 days for corona isolation,

    कोरोना आयसोलेशनसाठी ११ दिवस तो राहिला झाडावर, कुटुंबाला संसर्ग नको म्हणून विद्यार्थ्याचे दिव्य

    He stayed on the tree for 11 days for corona isolation,

    एकाच खोलीचे घर आणि घरात पाच-सहा जण. त्यामुळे तेलंगणातील एक विद्यार्थी कोरोना झाल्यावर आयसोलेशनमध्ये राहायचे म्हणून चक्क अकरा दिवस झाडावर राहिला. He stayed on the tree for 11 days for corona isolation,


    प्रतिनिधी

    हैद्राबाद : एकाच खोलीचे घर आणि घरात पाच-सहा जण. त्यामुळे तेलंगणातील एक विद्यार्थी कोरोना झाल्यावर आयसोलेशनमध्ये राहायचे म्हणून चक्क अकरा दिवस झाडावर राहिला.
    अठरा वर्षांचा शिवा या विद्यार्थ्याने अकरा दिवसासाठी झाडावरच स्वत:चे घर थाटले होते.

    जणू झाडच त्याचे कोविड आयसोलेशन वॉर्ड झाले होते. तेलंगणातील नालागोंडा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. आरोग्य व्यवस्था नाहीच, औषधेही नाहीत. पण याठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न आहे होम आयसोलेशनचा.

    येथील बहुतांश कुटुंबे एका खोलीच्या घरात राहतात. याच ठिकाणी स्वयंपाक करतात, टॉयलेटही तेथेच असते. त्यामुळे कोरोनारुग्णांना आयसोलेट कोडे करायचे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे.
    त्यामुळेच शिवाला एका झाडावर आसरा घ्यावा लागला.



    बांबू आणि गवताच्या सहाय्याने त्याने झाडावरच त्याचा बिछाना बनविला. कोठनंदीकोंडा या गावातील शिवा हा तरुण चार मे रोजी कोरोना बाधित झाला. त्याला गावातील स्वयंसेवकांनी घरातच आयसोलेट व्हायला सांगितले. पण त्याच्या घरात जागाच नव्हती. गावामध्येही आयसोलेशन सेंटर नव्हते. त्यामुळे स्वत:ला झाडावर आयसोलेट करण्याची कल्पना शिवाला सुचली.

    शिवाच्या गावात साडेतीनशे कुटुंबे राहतात. गावापासूनचे सर्वात जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र पाच किलोमीटर आहे. मात्र, प्रकृती गंभीर झाल्यास तीस किलोमीटर अंतरावर हॉस्पीटलमध्ये जावे लागते.

    तेलंगणाच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. पण तरीही आयसोलेशन सेंटरची कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच शिवासारख्या तरुणांना असे दिव्य करावे लागत आहे.

    He stayed on the tree for 11 days for corona isolation,

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे

    Election Commission : 22 कोटी मतदार ‘आधार’शी लिंक नाहीत, घरोघरी जाऊन पडताळणी; निवडणूक आयोगाची मोहीम