• Download App
    आठवड्यापूवी अंत्यसंस्कार झालेला घरी पोहोचला आणि...|He reached home after seven days of his funeral

    आठवड्यापूवी अंत्यसंस्कार झालेला घरी पोहोचला आणि…

    राजस्थानमधील राजसमंद येथे एका कुटुंबाने परिवारातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. यानंतर आठवड्याभरानंतर मृत झालेली व्यक्ती पुन्हा घरी परतली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.He reached home after seven days of his funeral


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राजस्थानमधील राजसमंद येथे एका कुटुंबाने परिवारातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. यानंतर आठवड्याभरानंतर मृत झालेली व्यक्ती पुन्हा घरी परतली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

    ११ मे रोजी दारूचे व्यसन असलेला ओमकारलाल आपल्या कुटूंबाला न सांगता उदयपूरला गेला होता. यकृताच्या काही आजारामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो तिथे उपचार घेत होता.



    लॉकडाउन लागल्यानंतर ओमकारलालचे कुटुंब त्याच्या भावाच्या घरी राहत होते. त्याच दिवशी काही लोकांनी गोवर्धन प्रजापतला आरके रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

    राजस्थानमधील आरके रुग्णालयाने उपचार घेत असलेल्या गोवर्धन प्रजापत नावाच्या व्यक्तीचा मृतदेह अज्ञात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रुग्णालयाने तो ओमकारलाल गाडोलिया या व्यक्तीच्या मृतदेह असल्याचे सांगत नातेवाईकांनी दिला.

    त्यानंतर गाडोलियाच्या कुटुंबियांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र १० दिवसांनी ओमकारलाल घरी परतला होता. त्याने दिलेल्या माहितीनंतर हे प्रकरण समोर आलं आहे.आम्हाला रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून एक पत्र मिळाले होते.

    त्यामध्ये तीन दिवसांपासून शवगृहात एक मृतदेह बेवारस पडलेला आहे असे सांगण्यात आले होते. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी मृत व्यक्तीची फोटो पाठवला होता.

    त्यानंतर १५ मे रोजी डझनभरहून अधिक लोक मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी रुग्णालयात आले. त्यानंतर एका कुटुंबाने ओळख पटवली होती. त्यांनी शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात देण्यासाठी लेखी पत्र दिले.

    ओमकारलाल गाडोलिया याच्या उजव्या आणि डाव्या हातावर जखम असल्याचे त्यांनी सारखाच वाटणारा गोवर्धनचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी शवविच्छेदन व डीएनए चाचणी न करता मृतदेह ताब्यात दिला.

    तो मृतदेह त्या कुटुंबाने ओळखला. डीनए चाचणी ही जर मृतदेह बेवारस असेल तर करण्यात येते असे,कांकरोली पोलिस स्टेशनचे अधिकारी योगेंद्र व्यास यांनी सांगितले.गाडोलिया कुटुंबाने त्या मृतदेहावर १५ मे रोजी अंत्यसंस्कार केले.

    परंतु,२३ मे रोजी ओमकारलाल घरी परत आला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्याला धक्का बसला. त्यानंतर पोलिसांना तपास सुरू केला आणि कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केलेला मृतदेहाबद्दल माहिती मिळवली.

    He reached home after seven days of his funeral

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य