विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणातील अल फलाह विद्यापीठात मनी लॉन्ड्री करण्यापासून ते दहशतवादापर्यंतचे सगळे खेळ उघडपणे झाले पण त्याच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उघडताच त्याच विद्यापीठाने विद्यार्थी आणि पालकांचे हित जपले पाहिजे असे अश्रू काढायचे चाळे सुरू केले.
अल फलाह विद्यापीठाला फक्त विना अनुदानित खासगी विद्यापीठाची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली, पण या विद्यापीठाने सेवाभावाच्या नावाखाली वेगवेगळे ट्रस्ट स्थापन करून लोकांकडून पैसे लाटले. 2018 – 19 या वर्षात तब्बल 415 कोटी रुपये वेगवेगळ्या सेवा उपक्रमांच्या नावाखाली या विद्यापीठाने गोळा केले, ज्याचा हिशेब अजूनही ED आणि EOF म्हणजेच इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला लागू शकला नाही. आता या विद्यापीठावर बंदी आणायची टांगती तलवार लटकते आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ बंद करणार नसल्याचे आश्वासन विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी पालकांना दिले.
– संशोधनाच्या नावाखाली स्फोटकांची निर्मिती
याच विद्यापीठांमधल्या 7 प्राध्यापकांनी संशोधनाच्या नावाखाली वेगवेगळी रसायने गोळा केली. त्याच रसायनांचा वापर करून दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये प्रचंड स्फोट घडवायची कारस्थाने केली. तब्बल 3000 किलो स्फोटके तयार केली. म्हणून या 7 प्राध्यापकांना अटक झाली. अन्य 11 प्राध्यापक याच प्रकरणात फरार झाले. पोलीस त्यांच्या शोधात आहेत. अटक केलेल्या प्राध्यापकांच्या चौकशी आणि तपासा दरम्यान अल फालाह विद्यापीठाचे दहशतवादी कनेक्शन पाकिस्तान आणि तुर्कस्तान पर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
पण याच विद्यापीठाने आता विद्यार्थी आणि पालकांचे हित जपले पाहिजे म्हणून विद्यापीठ बंद करणार नाही, असा दावा केला. 20 विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांचे हित जपण्याविषयी निवेदन दिले. त्यावेळी विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांनी मोठेपणाचा आव आणून आम्ही विद्यार्थी आणि पालकांचे हित जपण्यासाठी कटिबद्ध आहोत विद्यापीठ बंद करणार नाही, असे आश्वासन संबंधित पालकांना दिले.
– ED ची छापेमारी
अल फलाह विद्यापीठाशी संबंधित मुख्य कॅम्पस बरोबर अन्य 25 ठिकाणी ED ने छापेमारी करून हजारो डॉक्युमेंट्स, 48 कोटी रुपयांची कॅश आणि अन्य डिजिटल पुरावे गोळा केले ज्यांचा संबंध थेट मनी लॉन्ड्रीग आणि दहशतवादाशी निघाला. मात्र त्याबद्दल विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही.
Haryana | Parent of one of the student studying in Al-Falah University, Khushpal Singh
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा; शरद पवारांचा डाव काँग्रेसने बरोबर ओळखला!!
- Ludhiana :लुधियानामध्ये दहशतवाद्यांचा एन्काउंटर, एकाला 3, तर दुसऱ्याला 1 गोळी लागली, PAK टेरर मॉड्यूलशी कनेक्शन
- Robert Vadra, : मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; ईडीने युकेस्थित संजय भंडारींशी संबंधित प्रकरणात आरोपी केले
- श्री भगवान सत्य साईबाबांनी मानवसेवा हाच खरा धर्म मानला; जन्मशताब्दी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लाभार्थ्यांना ऑटो रिक्षा वाटप