• Download App
    हरियाणा सरकार अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार|Haryana government to give 10 percent reservation to firemen in government jobs

    हरियाणा सरकार अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत अग्निवीर योजनेचा मुद्दा मांडला होता


    विशेष प्रतिनिधी

    हरियाणाच्या नायब सिंह सैनी सरकारने अग्निवीरबाबत मोठी घोषणा केली आहे. हरियाणामध्ये अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, अग्निवीरला आता पोलीस भरती आणि खाण मंडळ भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण दिले जाईल. याशिवाय गट क आणि ड मध्येही वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे. याशिवाय स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी गट क मध्ये 5 टक्के आरक्षण आणि 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिले जाणार आहे.Haryana government to give 10 percent reservation to firemen in government jobs



    अग्निवीर योजना बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. अगदी अलीकडे संसदेत अग्निपथ योजनेचा मुद्दा उपस्थित झाला होता. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत अग्निवीर योजनेचा मुद्दा मांडला होता. केंद्र सरकारच्या या योजनेचा दाखला देत ते म्हणाले होते की, केंद्र सरकार अग्निवीरला हुतात्मा दर्जा देत नाही. केंद्र सरकारवर हल्लाबोल करत त्यांनी अग्निवीर योजनेला वापरा आणि फेका असे म्हटले. तथापि, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ लष्करी भरती योजनेबाबत राहुल गांधींचे दावे फेटाळले होते. १५८ संघटनांच्या सूचना घेऊन ही योजना सुरू करण्यात आल्याचे राजनाथ सिंह म्हणाले होते.

    हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की अग्निपथ योजना पंतप्रधान मोदींनी १४ जून २०२२ रोजी लागू केली आहे. या योजनेंतर्गत अग्निवीर भारतीय लष्करात ४ वर्षांसाठी तैनात असतात. सरकार हरियाणातील अग्निशमन दलातील हवालदार, खाण रक्षक, वनरक्षक, जेल वॉर्डन आणि SPO या पदांसाठी थेट भरतीमध्ये राज्य सरकारद्वारे 10 टक्के आरक्षण प्रदान करेल.

    Haryana government to give 10 percent reservation to firemen in government jobs

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका