विशेष प्रतिनिधी
चंदीगड: अनैतिक कृत्ये आणि गैरव्यवहारांप्रकरणी सामान्यपणे ‘गोरखधंदा’ हा शब्द वापरण्यात येतो. मात्र, हरयाणा सरकारने या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. ‘गोरखधंदा’ या शब्दामुळे एका समाजाच्या भावना दुखवल्या जात आहेत.Haryana government bans the word ‘Gaurakhdhanda’, decides not to hurt the feelings of Sant Gorakhnath’s followers
यामुळे या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या शब्दामुळे संत गोरखनाथ यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले.
गोरखनाथ समाजाच्या एका प्रतिनिधी मंडळाच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या शब्दाच्या वापराने मनं दुखावली जात आहेत.
यामुळे हरयाणात या शब्दावर बंदी घालावी, अशी मागणी समाजाच्या प्रतिनिधींनी केली. या शब्दाच्या नकारात्मक अथार्मुळे गोरखनाथ यांच्या अनुयायींच्या भावना दुखावत असल्याचे मनोहरलाल खट्टर म्हणाले.
गुरु गोरखनाथ हे महान संत होते.
यामुळे कुठल्याही भाषेत, भाषणात किंवा इतर कुठल्या संदर्भात हा शब्द वापरण्याने त्यांच्या अनुयायांचे भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे कुठल्याही संदर्भात या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, असं खट्टर यांनी स्पष्ट केलं.
Haryana government bans the word ‘Gaurakhdhanda’, decides not to hurt the feelings of Sant Gorakhnath’s followers
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
- शबरीमला मंदिरात वडिलांसोबत दर्शनास जाण्याची अल्पवयीन मुलीला परवानगी
- मराठवाड्यात सर्वदूर बरसल्या श्रावणधारा, पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान
- महाराष्ट्र ठरले एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य
- राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल