विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणात एक्झिट पोलच्या बळावर काँग्रेसचे 3 – 4 मुख्यमंत्री एकदम चढले गादीवर!!, अशी अवस्था आज सायंकाळी आली. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 90 जागांवर मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी एक्झिट पोल जाहीर झाले. त्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल मधून हरियाणा मध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असा निष्कर्ष निघाला. काँग्रेसला 90 पैकी 44 ते 54 जागा मिळू शकतील, तर भाजपला 24 ते 31 जागांपर्यंतच थांबावे लागेल, असा दावा एक्झिट पोल्सनी केला.
या एक्झिट पोलचा निष्कर्ष समोर आल्याबरोबर काँग्रेसमध्ये आनंदाचे भरते आले, पण त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीव्र झाली. 78 वर्षांचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी काँग्रेसच्या प्रचाराची सगळी सूत्रे स्वतःच्या ताब्यात ठेवून तिकीट वाटपात वरचष्मा राखला होता. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या रेस मधले बाकीचे नेते मागे सारले होते. परंतु, कुमारी शैलजा, दिपेंद्र सिंग हुड्डा आणि रणदीप सुरजेवाला यांनी भूपेंद्र सिंग हुड्डा
यांचे ऐकले नाही. त्यांनी आपापल्या मुख्यमंत्रीपदाच्या हॅट रिंग मध्ये टाकूनच ठेवल्या.
आज मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचा निष्कर्ष बाहेर आल्याबरोबर यातल्या प्रत्येकाने मुख्यमंत्रीपदावर आपला दावा ठोकला काँग्रेस हायकमांड योग्य तो निर्णय घेईल. कुठल्याही नेत्याने केवळ जेष्ठत्वाच्या निकषावर स्वतःला मुख्यमंत्री समजू नये, असे हे सगळेच नेते एकमेकांना म्हणाल्याच्या बातम्या समोर आल्या. मी निवडणूक लढलो नसलो, तरी सरकार चालवायची इच्छा असल्यास गैर नाही मुख्यमंत्रीपदाचे महत्त्वाकांक्षा बाळगण्यातही गैर नाही, असे वक्तव्य सुरजेवाला यांनी केले. कुमारी शैलजा यांनी आधीपासूनच मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर करून ठेवली आहे. त्याचबरोबर भूपेंद्रसिंग हुड्डांचे चिरंजीव खासदार दिपेंद्रसिंग हुड्डा यांना देखील वरिष्ठ नेत्यांच्या संघर्षात मध्येच आपला नंबर लागण्याची अपेक्षा आहे.
Haryana Exit Poll congress cm ?
महत्वाच्या बातम्या
- Jaishankar : परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानला जाणार, 15-16 ऑक्टोबरला SCO बैठकीत सहभागी होणार
- NCP : पवारांचा पक्ष लढवणार 80 ते 85 जागा; इच्छुकांच्या मुलाखती घेणार 24 नेत्यांचे पार्लमेंटरी बोर्ड!!
- Siddaramaiah : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यानंतर MUDA घोटाळ्यात आणखी एक काँग्रेस मंत्री अडकले
- Israel Iran war : इस्रायल-इराण युद्धादरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने दिली मोठी धमकी