५ निरीक्षकांसह १७ जणांवर एफआयआर तर अनेकांना केले निलंबित Naib Singh Saini
विशेष प्रतनिधी
चंदीगड : हरियाणा बोर्डाच्या पेपरफुटी प्रकरणात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी Naib Singh Saini यांनी कठोर कारवाई केली आहे. शनिवारी उशिरा मुख्यमंत्री नायब यांनी या प्रकरणाबाबत केलेल्या कारवाईची माहिती माध्यमांना दिली. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की, पेपर लीक प्रकरणात ५ निरीक्षकांसह १७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर अनेकांना निलंबित करण्यात आले आहे. Naib Singh Saini
हरियाणा बोर्डाच्या पेपरफुटीवर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, ‘आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सरकारी शाळांच्या चार निरीक्षकांविरुद्ध आणि एका खासगी शाळेच्या एका निरीक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले, ‘सरकारी शाळांच्या चारही निरीक्षकांनानिलंबित करण्यात आले आहे.’
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, ‘आम्ही २ केंद्र पर्यवेक्षकांवर कारवाई केली आहे, संजीव कुमार आणि सत्यनारायण यांनाही निलंबित करण्यात आले आहे. ४ बाहेरील लोक आणि ८ विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
तसेच, ‘प्रारंभिक तपासात २५ पोलिस अधिकारी दोषी आढळले आहेत. ४ डीएसपी आणि ३ एसएचओसह सर्व २५ पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या परिसरात अशीच एक घटना घडली आहे. सरकारने ते गांभीर्याने घेतले आहे, कारण आमचे सरकार याविरुद्ध शून्य सहनशीलतेवर काम करत आहे आणि आम्ही ते सहन करणार नाही.
Haryana Chief Minister Naib Singh Saini takes strict action in the Haryana Board paper leak case
महत्वाच्या बातम्या
- भारत आणि महाराष्ट्राप्रमाणेच बांगलादेशातही उद्भवली नवी NCP!!; पण कुणी, कशी आणि का काढली??
- व्हॉट्सअँप सेवेच्या माध्यमातून “आपले सरकार”च्या ५०० सेवा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- D K Shivakumar : महाकुंभच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल डी.के.शिवकुमार यांनी केले मुख्यमंत्री योगींचे कौतुक
- EPFO : EPFOने २०२४-२५ साठी PF ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के ठेवला कायम