विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आणि त्यामुळेच “द प्रेसिडेंट ऑफ भारत” आणि “द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत” असे लिहायला सुरुवात केली, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला, पण प्रत्यक्षात मोदींच्या ऐवजी काँग्रेस नेतेच खरे घाबरल्याचे समोर आले आहे. कारण काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी विरोधकांच्या आघाडीचे I.N.D.I.A हे नाव बदलून त्या ऐवजी BHARAT हे नाव द्यावे असे सुचविले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतल्या नेत्यांचा कॉन्फिडन्स पूर्ण खालावल्याचेच दिसून येत आहे. Harmony And Responsible Advancement for Tomorrow (BHARAT)
केंद्रातील मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर 2023 संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आणि त्यानंतर एक देश एक निवडणूक समिती स्थापन केली, तसेच जी 20 च्या निमंत्रण पत्रिकेत “द प्रेसिडेंट ऑफ भारत” असे छापले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याचा कार्यक्रम “द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत” अशा नावाने छापला.
त्यामुळे देशभरात इंडिया विरुद्ध भारत अशी लढाई सुरू झाली. विरोधकांनी स्वतःच्या आघाडीला “इंडिया” नाव घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले. यह डर अच्छा है, असे ट्विट काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केले. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांना “इंडिया” नाव पुसण्याची भीती वाटली. त्यामुळे त्यांनी मोदींना नावे ठेवणारी ट्विट केली.
पण या पार्श्वभूमीवर खरं म्हणजे काँग्रेस नेतेच घाबरल्याचे दिसून येते आणि तेच नेमके शशी थरूर यांच्या ट्विट मधून समोर आले. शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये विरोधकांनी
I.N.D.I.A हे नाव बदलून स्वतःला BHARAT
हे नाव घ्यावे अशी सूचना करून त्या भारत शब्दाची फोड देखील करून दाखविली. शशी थरूर यांच्या मते भारत या शब्दाची, alliance for Betterment Harmony And Responsible Advancement for Tomorrow म्हणजेच BHARAT अशी फोड करता येऊ शकेल हे त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे.
पण त्यामुळे “इंडिया” आघाडीतले नेतेच घाबरले आणि ते नाव देखील टाकून देऊन नवीन नाव “भारत” स्वीकारण्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आधीच मोदी विरोधकांच्या आघाडीने स्वतःचे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स अर्थात यूपीए हे नाव टाकून दिले. कारण ते भ्रष्टाचाराची जोडले गेले होते. त्यानंतर महिना दीड महिन्यापूर्वीच त्यांनी स्वतःला “इंडिया” हे नाव धारण केले. पण आता ते देखील नाव मोदींच्या धास्तीने टाकून देऊन त्याऐवजी BHARAT नाव धारण करावे, अशी सूचना खासदार शशी थरूर यांनी केल्यामुळे काँग्रेसमधल्या नेत्यांची खरी भीती बाहेर आली.
Harmony And Responsible Advancement for Tomorrow (BHARAT)
महत्वाच्या बातम्या
- गोविंदांच्या आनंदावर विरजण; यंदा दहीहंडी केवळ रात्री दहा वाजेपर्यंत
- हरियाणाच्या कर्नालमध्ये काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी, एकमेकांविरोधात घोषणाबाजी
- द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत नरेंद्र मोदी आज आसियान बैठकीसाठी इंडोनेशियात!!
- Chandrayaan-3 Mission : चंद्रावर स्लीपिंग मोडमध्ये असलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र आले समोर , इस्रोने दिला मोठा अपडेट