• Download App
    सिद्धू आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणजे पंचप्यारे ; काँग्रेसचे नेते हरीश रावत उधळली मुक्ताफळे; चूक लक्षात येताच मागितली माफी Harish Rawat Apologizes For Calling Sidhu And Working Presidents Panj Pyare

    सिद्धू आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणजे पंचप्यारे ; काँग्रेसचे नेते हरीश रावत उधळली मुक्ताफळे; चूक लक्षात येताच मागितली माफी

    वृत्तसंस्था

    चंडीगढ़ : पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी नवज्योत सिंह सिद्धू आणि चार कार्यकारी अध्यक्षांना पंचप्यारे यांची उपमा देऊन नव्या वादाला तोंड फोडले असून शिरोमणी अकाली दल,श्री अकाल तख्त साहिब आणि पंजाबी नागरिकांचा रोष ओढवून घेतला आहे. या नंतर त्यांनी माफीही मागितली असून उत्तराखण्ड येथील गुरुद्वारात झाडू मारून पापक्षालन करणार असल्याचे जाहीर केले. Harish Rawat Apologizes For Calling Sidhu And Working Presidents Panj Pyare

    शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंह यांनी आपल्या शिष्यांची एक कठोर परीक्षा घेतली. धर्मरक्षणासाठी कोण सर्वोच्च बलिदानासाठी तयार आहेत. हे त्यांना पहायचे होते. त्यामध्ये त्यांचे पाच शिष्य खरे उतरले. त्यानाच पंच प्यारे असे संबोधले जाते.



    या उलट काँग्रेस ही अहिंसेची पुजारी मानली जाते तर शीख समाज हा लढवय्या मानला जातो. एकाने गालावर कानाखाली मारली तर लगेच दुसरा गाल पुढे करावा, अशी काँग्रेसची नीती. पण, अशा नितीत न बसणारे वक्तव्य करून रावत यांनी नवा वाद ओढवून घेतला. या उलट कानाखाली मारली तर पूर्ण डोकेच उडवावे, अशी आक्रमक वृत्ती शिखांची आहे.

    परस्पर विरोधी गोष्टींची सांगड घालण्याचा रावत यांचा प्रयत्न त्यांच्या आता अंगाशी आला आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते डॉ. दलजीत सिंह चिमा यांनी त्यांच्याकडे माफी मागावी अशी मागणी केली आहे.

    Harish Rawat Apologizes For Calling Sidhu And Working Presidents Panj Pyare

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते