विशेष प्रतिनिधी
जोधपूर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. 28 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. दुसरीकडे, महाराष्ट्रातील भाजप नेत्या विजया रहाटकर ह्या राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रभारी म्हणून काम करत आहेत. नवे राज्यपाल बागडे हे रहाटकर यांचे राजकीय गुरू आहेत. त्यामुळं आता बागडे आणि रहाटकर हे गुरु-शिष्य राजस्थानमध्ये एकत्र काम करणार आहेत. Haribhau Bagde is the governor, while Vijaya Rahatkar, who has achieved success in the assembly, is the BJP in-charge
हरिभाऊ बागडे हे विजया रहाटकर यांचे राजकीय गुरू आहेत. बागडे यांच्यामुळेच रहाटकर यांची राजकीय कारकीर्द चमकदार राहिली. बागडे यांच्यामुळेच रहाटकर यांना संभाजीनगरच्या महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच रहाटकर यांना भापजच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून संधी मिळाली. इतकचं नाही तर राज्य महिला आयोगाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होता. त्यानंतर 9 सप्टेंबर 2022 मध्ये रहाटकर यांची राजस्थानच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
रहाटकर यांच्या कारकीर्दीत विधासनभेत भाजपला यश
विजयाताई रहाटकर पक्षाच्या प्रभारी म्हणून काम करत असताना राजस्थान विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजपने विधासनभा निवडणुकीत कॉंग्रेसला धूळ चारत अभूतपूर्व विजय मिळला. राजस्थानात भाजपच्या विजयात रहाटकर यांची महत्त्वाची भूमिका राहिली. यामुळे पक्षात विजयाताई रहाटकर यांचे वजन वाढले. सध्या रहाटकर ह्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी असून आता बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राजस्थान सरकारवर एकप्रकारे सध्या महाराष्ट्रातील नेत्यांचं नियंत्रण असणार आहे.
कोण आहेत हरिभाऊ बागडे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले हरिभाऊ बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. राज्यात भाजप बाळसे धरत असताना १९८५ मध्ये तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते सर्वप्रथम आमदार झाले. १९९५ मध्ये रोहयो मंत्री झाले. २००९ मध्ये फुलंब्रीतून त्यांचा पराभव झाला. मात्र नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोनदा ते पुन्हा आमदार झाले. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधवांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बागडे चक्क दुचाकीवर आले होते.
Haribhau Bagde is the governor, while Vijaya Rahatkar, who has achieved success in the assembly, is the BJP in-charge
महत्वाच्या बातम्या
- Sudhir mungantiwar targets sharad pawar : 7 खासदारांच्या नेत्याला पंतप्रधान सोडा, गृहमंत्री देखील होता येत नाही, तेव्हाच…!
- कुपवाडात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी, एक शहीद
- आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या, पात्रता काय असावी?
- विधान परिषदेत शेकापचा उमेदवार पडला, मविआतले छोटे पक्ष दुखावले, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा आता स्वबळाचा नारा!!