• Download App
    पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शिख उमेदवार शोधण्याच्या नादात दिल्लीतील लसीकरण रखडले, ११ लाख डोस असताना ७६ हजार जणांनाच लस दिल्याचा हरदीप पूरी यांचा आरोप|Hardeep Puri alleges that only 76,000 people were vaccinated with 11 lakh doses in reserve

    पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शिख उमेदवार शोधण्याच्या नादात दिल्लीतील लसीकरण रखडले, ११ लाख डोस असताना ७६ हजार जणांनाच लस दिल्याचा हरदीप पूरी यांचा आरोप

    पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शिख उमेदवार शोधण्याच्या नादात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे लसीकरण मोहीमेकडे दूर्लक्ष झाले आहे. देशात सोमवारी एकाच दिवशी लसीकरणाचा उच्चांक झाला. मात्र, दिल्लीमध्ये केवळ ७६,२५९ जणांचे लसीकरण करण्यात आले. ११ लाख लसींचे डोस उपलब्ध असतानाही लसीकरण करण्यात आले नाही असा आरोप केंद्रीय मंत्री हरदीप पूरी यांनी केला आहे.Hardeep Puri alleges that only 76,000 people were vaccinated with 11 lakh doses in reserve


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शिख उमेदवार शोधण्याच्या नादात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे लसीकरण मोहीमेकडे दूर्लक्ष झाले आहे. देशात सोमवारी एकाच दिवशी लसीकरणाचा उच्चांक झाला.

    मात्र, दिल्लीमध्ये केवळ ७६,२५९ जणांचे लसीकरण करण्यात आले. ११ लाख लसींचे डोस उपलब्ध असतानाही लसीकरण करण्यात आले नाही असा आरोप केंद्रीय मंत्री हरदीप पूरी यांनी केला आहे.हरदीप पूरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्या दिवशी भारतामध्ये ८४ लाख लोकांचे विक्रमी लसीकरण झाले त्याच दिवशी दिल्लीमध्ये केवळ ७६,२५९ जणांचे लसीकरण झाले. ११ लाख लसींचे डोस शिल्लक असतानाही इतके कमी लसीकरण का झाले?



    हरदीप पूरी म्हणाले, दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल हे पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तयारीत मग्न आहेत. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांच्या आरोग्य आणि जनकल्याण योजनांकडे त्यांचे दूर्लक्ष झाले आहे. त्यांना पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शिख चेहरा शोधायचा आहे. मात्र, दिल्लीतील नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे.

    पंजाबमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख असेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ज्याच्यावर संपूर्ण पंजाबला अभिमान वाटतो, अशी शीख व्यक्ती यंदा ‘आप’मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, असे केजरीवाल यांनी जाहीर केले.

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कमी लसीकरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकार दिल्लीतील अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहे की त्यांनी लसीकरणाबाबत धन्यवाद देणाऱ्या जाहिराती प्रसिध्द कराव्यात.

    Hardeep Puri alleges that only 76,000 people were vaccinated with 11 lakh doses in reserve

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य