• Download App
    वादग्रस्त पोस्टनंतर भज्जीने मागितली माफी, म्हणाला- मी एक शीख आहे, जो कायम भारतासाठी लढेल, भारताविरुद्ध नाही! । Harbhajan Singh apologizes for Instagram post on Jarnail Bhindranwale

    वादग्रस्त पोस्टनंतर भज्जीने मागितली माफी, म्हणाला- मी एक शीख आहे, जो कायम भारतासाठी लढेल, भारताविरुद्ध नाही!

    Harbhajan Singh apologizes : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हरभजन सिंहने त्याच्या वादग्रस्त इन्स्टाग्राम पोस्टबद्दल सर्वांची माफी मागितली आहे. भज्जीने त्याचा माफीनामा सोशल मीडियावर शेअर केला आहे. भज्जीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर ऑपरेशन ब्लू स्टारच्या 37व्या स्मृतिदिनानिमित्त सुवर्णमंदिरात ठार झालेल्या जरनैलसिंग भिंद्रनवाले यांना श्रद्धांजली वाहत त्यांना ‘शहीद’ म्हटले होते. या पोस्टनंतर भज्जीवर चौफेर टीकेची झोड उठली होती. Harbhajan Singh apologizes for Instagram post on Jarnail Bhindranwale


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हरभजन सिंहने त्याच्या वादग्रस्त इन्स्टाग्राम पोस्टबद्दल सर्वांची माफी मागितली आहे. भज्जीने त्याचा माफीनामा सोशल मीडियावर शेअर केला आहे. भज्जीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर ऑपरेशन ब्लू स्टारच्या 37व्या स्मृतिदिनानिमित्त सुवर्णमंदिरात ठार झालेल्या जरनैलसिंग भिंद्रनवाले यांना श्रद्धांजली वाहत त्यांना ‘शहीद’ म्हटले होते. या पोस्टनंतर भज्जीवर चौफेर टीकेची झोड उठली होती.

    माफी मागताना भज्जी म्हणाला की, 20 वर्षांपासून मी देशासाठी माझे रक्त आणि घाम गाळला आहे. जे काही भारताच्या विरोधात आहे त्याचे कधीही समर्थन करणार नाही, मी एक शीख आहे जो कायम भारतासाठी लढेल, भारताविरुद्ध नाही.

    हरभजनने आपल्या वादग्रस्त पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत भिंद्रनवालेचे नाव स्पष्टपणे नमूद नाही. ऑपरेशन ब्लू स्टार 1 जून ते 8 जून 1984 दरम्यान अमृतसरच्या सुवर्णमंदिरात झाले. भारतीय सैन्याने केलेले हे एक मोठे अभियान होते. भज्जीने दिलगिरी व्यक्त करताना लिहिले की, ‘मी काल इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. ते व्हाट्सएप फॉरवर्ड होते, जे मी न पाहताच आणि त्याचा अर्थ काय हे जाणून घेतल्याशिवाय घाईघाईने शेअर केले.

    पुढे त्याने लिहिले की, ‘ही माझी चूक होती आणि मी ती स्वीकारतो. या पोस्टमधील फोटोचे मी कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. मी एक शीख आहे, जो देशासाठी लढेल, देशाविरुद्ध नाही. देशवासीयांच्या भावना दुखावल्याबद्दल मी बिनशर्त दिलगिरी व्यक्त करतो. मी माझ्या देशवासीयांविरुद्ध कोणत्याही गटाला पाठिंबा देत नाही किंवा कधीही देणार नाही. मी 20 वर्षांपासून या देशासाठी रक्त आणि घाम गाळला आहे. जे काही भारताच्या विरोधात आहे त्याचे मी कधीही समर्थन करणार नाही. जय हिंद!’

    Harbhajan Singh apologizes for Instagram post on Jarnail Bhindranwale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य