विशेष प्रतिनिधी
वाराणसी : काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डमरू वाजवून हर हर महादेवचा गजर केला. काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी काशी विश्वनाथाच्या मंदिरात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचं स्वागत पुजाऱ्यांनी डमरू वाजवून केलं.Har Har Mahadev, PM’s playing Damru in Varanasi
मंदिराच्या बाहेर मोदींनी पुजाऱ्यांच्या हातून डमरू घेत स्वत: वाजवलं. पंतप्रधान मोदींचे डमरू वाजवतानाचे व्हिडीओ आणि फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत.पंतप्रधान मोदींचं हे रुप यापूवीर्ही अनेकदा पाहायला मिळालं आहे.
पंतप्रधान मोदी हे ज्या राज्यात जातात, जिथे सभा किंवा रॅली करतात तेखील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी प्रादेशिक भाषेत संवाद साधतात. गुजरातमध्ये गुजराती, महाराष्ट्रात मराठी, कर्नाटकात कानडी भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात करतात.
तसंच तेथिल महान पुरुषांना अभिवादन करतात. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी आपण गेलेल्या भागातील परंपरा जपण्याचाही प्रयत्न करतात. त्याचाच भाग म्हणून ते विविध पेहराव, टोपी घातलेले आणि विविध प्रकारची वाद्य वाजवताना पाहायला मिळतात.
जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदी त्रिपुरा आणि मणिपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळीही मोदींनी त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवली होती. त्यावेळी मोदींनीही कलाकारांमध्ये जाऊन ढोल वाजवला होता.