Tuesday, 13 May 2025
  • Download App
    हर हर महादेव आणि अल्लाहू अकबरच्या झाशीच्या राणीची परंपरा अद्यापही पाळताहेत झाशीकर|Har Har Mahadev and Allahu Akbar's tradition of Queen of Jhansi is still followed by Jhashikar

    हर हर महादेव आणि अल्लाहू अकबरच्या झाशीच्या राणीची परंपरा अद्यापही पाळताहेत झाशीकर

    विशेष प्रतिनिधी

    झाशी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू- मुस्लिम एकतेचे उदाहरण घालून दिले होते. त्यांच्या सैन्यात हर हर महादेव आणि अल्ला हू अकबरच्या घोषणा एकत्रितपणे दिल्या जायच्या. याच धार्मिक सलोख्याचे उदाहरण झाशीकरांनी पुन्हा घालून दिले आहे.Har Har Mahadev and Allahu Akbar’s tradition of Queen of Jhansi is still followed by Jhashikar

    धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यातच झाशी शहरातील एका मंदिर आणि मशिदीतील लाऊडस्पीकर स्वेच्छेने हटवण्यात आले आहेत. मंदिराचे पुजारी आणि मशिदीचे इमाम यांनी स्वत: पुढे सरसावून हे काम केले आहे. झाशी महानगराला लागून असलेल्या बारागावच्या गांधी चौकात रामजानकी मंदिर आहे. जवळच जामा मशीददेखील आहे.



    मंदिरात सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळी लाऊडस्पीकर वाजत असत. पाचवेळच्या नमाजाच्या वेळी मशिदीत लाऊडस्पीकरचा वापर करण्यात यतो. गेल्या अनेक दशकांपासून येथे असेच घडत आले आहे. पण, धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या वापराबाबत देशभरात सुरू असलेला वाद पाहता मंदिराचे महंत श्याम मोहन दास आणि मशिदीचे इमाम हाफिज मोहम्मद ताज आलम पुढे सरसावले आणि त्यांनी आपापल्या धार्मिक स्थळावरील लाऊडस्पीकर हटवले. आता मंदिर-मशिदीत त्यांचे आपापले धार्मिक कार्यक्रम कोणताही आवाज न करता नियमितपणे सुरू आहेत.

    1857 च्या युद्धात वीरांगना लक्ष्मीबाईंच्या सैन्यात एकीकडे हर हर महादेवच्या जयघोषात, तर दुसरीकडे अल्लाह हु अकबरचा नारा घुमत होता. धर्म भिन्न होते, पण झांशीला फिरंग्यांपासून मुक्त करणे हे एक सर्वांचे ध्येय होते. झाशी आणि राणीसाठी शेकडो हिंदू मुस्लिमांनी हसत-हसत प्राणाचे बलिदान दिले होते. झाशीने आजही जातीय एकता आणि सौहादार्चा हा वारसा जपला आहे.

    मंदिरात नियमित सकाळ-संध्याकाळ आरती आणि भजन-कीर्तन होत असले तरी आता लाऊडस्पीकरचा वापर केला जात नाही. सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडत आहेत, अशी प्रतिक्रिया मंदिराचे महंत श्याम मोहन दास यांनी दिली. तर मशिदीचे हाफिज मोहम्मद ताज आलम यांनी सांगितले, की मशिदीत गेल्या अनेक वर्षांपासून दोन लाऊडस्पीकर लावण्यात आले होते. ते काढून टाकण्यात आले आहेत. आता लाऊडस्पीकर न वापरता पाच वेळा नमाज अदा केली जात आहे.

    Har Har Mahadev and Allahu Akbar’s tradition of Queen of Jhansi is still followed by Jhashikar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!