वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना “हर घर तिरंगा” अभियानाला अभुतपूर्व यश मिळाले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने देशभरात एकूण 30 कोटींहून अधिक राष्ट्रध्वजांची विक्री झाली आहे. याचा अर्थ 30 कोटींबून घरांवर तिरंगे फडकले आहेत!!Har Ghar Tiranga : Tricolor hoisted on more than 30 crore houses!!; More than 1 million jobs; 500 crore business!!
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या अभियानामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा फायदा झाला आहे. आतापर्यंत जवळपास 500 कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. शिवाय 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.
500 करोडहून अधिकचा व्यवसाय – CAIT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जुलैला “हर घर तिरंगा” अभियानाची घोषणा केली होती. तेव्हापासून तिरंग्याच्या विक्रीत 50 पट वाढ झाली आहे. कन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) दिलेल्या माहितीनुसार यावर्षी 30 कोटी राष्ट्रध्वजांची विक्री झाली आहे. त्यामुळे जवळपास 500 कोटींचा व्यवसाय झाला आहे.
20 दिवसांत 30 कोटींहून अधिक राष्ट्रध्वजांची निर्मिती
CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ‘हर घर तिरंगा ‘अभियानाने भारतीय उद्योजकांची क्षमता आणि सामर्थ्य दाखवून दिले आहे. उद्योजकांनी तिरंग्याची अभूतपूर्व मागणी पूर्ण करून 20 दिवसांच्या कालावधीत 30 कोटींहून अधिक ध्वज एक विक्रम प्रस्थापित केला आहे.
10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार
केंद्र सरकारने यंदा पॉलिस्टर आणि मशीनपासून बनवलेले ध्वज फडवकवण्याची मान्यता दिली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत 200 ते 250 कोटींच्या तिरंग्यांची विक्री होते. मात्र यंदा विक्रीचा हा आकडा 500 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. इतकेच नाही तर 10 लाखांहून अधिक लोकांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
महाराष्ट्रसह अनेक राज्यात व्यापार तेजीत
गुजरात मधील सुरत आणि दिल्लीशिवाय, महाराष्ट्र, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, ओडिसा, बिहार, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातही मोठ्या प्रमाणावर तिरंगे बनवण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगे पोहोचवले गेले.
Har Ghar Tiranga : Tricolor hoisted on more than 30 crore houses!!; More than 1 million jobs; 500 crore business!!
महत्वाच्या बातम्या
- तालिबान राजवटीत अफगाणिस्तान बेहाल : बजेटमध्ये 65 टक्के कपात; एका वर्षात 2,106 लोक ठार
- मुकेश अंबानींच्या कुटुंबाला धमकीचे 8 फोन, 3 तासांत सगळ्यांना संपविण्याची धमकी!!; सगळीकडे हाय अलर्ट!!
- हाँगकाँगमधून वर्षभरात १.१२ लाख लोकांचे पलायन : राष्ट्रपती जिनपिंग यांची धोरण, कोरोना निर्बंध कारणीभूत
- पंतप्रधान मोदींचा लाल किल्ल्यावरुन नवा नारा, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान!!