प्रतिनिधी
मुंबई : देशात आठ वंदे भारत एक्सप्रेस अनेक राज्यांतर्गत सुरू झाल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा महाराष्ट्रातच फिरणाऱ्या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. या समारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांना केंद्राने मध्यमवर्गीयांसाठी दिलेल्या बजेट मधल्या सोयी सवलतींची तपशीलवार माहिती देखील दिली आहे. Happy to be in Mumbai. Inaugurating projects aimed at boosting connectivity in Maharashtra.
देशातल्या आठ वंदे भारत एक्सप्रेस एका राज्यांमधून दुसऱ्या राज्यांमध्ये प्रवास करतात. एकूण बारा राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसने वेगवेगळे शहरे जोडली आहेत. पण महाराष्ट्रात आज सुरू केलेल्या दोन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातल्याच मुंबई शहरापासून महाराष्ट्रातल्या दोन वेगवेगळ्या शहरांना जोडणाऱ्या ठरल्या आहेत. मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस नाशिक मार्गे जाणार आहे,तर मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे जाणार आहे. त्यामुळे देशातल्या आर्थिक राजधानीतून आर्थिक उपराजधानीची कनेक्टिव्हिटी वंदे भारत एक्सप्रेस मुळे झाल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात नमूद केले.
त्याचवेळी पंतप्रधानांनी मध्यमवर्गीयांना केंद्रीय बजेटमध्ये दिलेल्या सोयी सवलतींचा अर्थ समजावून सांगितला आहे. यूपीए काळात मध्यमवर्गीयांवरच्या उत्पन्नावर 20 % कर लागत होता. मात्र आता केंद्र सरकारने 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे ज्या तरुणांचे पगार 60 ते 65 हजार रुपये आहेत, अशांना कर भरण्याऐवजी गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे.
मोदींनी आजच्याच मुंबई दौऱ्यात उड्डाणपूल आणि एलव्हेटेड मार्गांचे ही उद्घाटन केले आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा दौरा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याच्या अटकळी मराठी प्रसार माध्यमांनी बांधल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा उपयोग करून घेण्याचे भाजपने ठरविल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. पण त्यापलिकडे जाऊन मोदींनी फक्त मुंबईकर मध्यमवर्गीयांनाच नव्हे, तर देशातल्या मध्यमवर्गीयांना विशेषतः करून नोकरदार वर्गाला बजेट मधून कशा संधी मिळाल्या आहेत, हे समजावून सांगितले आहे.
Happy to be in Mumbai. Inaugurating projects aimed at boosting connectivity in Maharashtra.
महत्वाच्या बातम्या
- तुर्कीचा भारतविरोध विसरून भारताची तुर्कीला मदत; तुर्की महिलेची भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी
- शेकडो विद्यार्थ्यी, सोशल मीडिया एन्फुएन्झर्सना आज मुंबईतून वंदे भारत एक्सप्रेसची मोफत सफर
- राज्यसभेत मोदींच्या भाषणात विरोधकांच्या घोषणाबाजीचे अडथळे, पण समाजातील लाभार्थ्यांना १०० % लाभाचा पंतप्रधानांचा निर्धार